आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत
सांगली दि. २४ जुलै २१ : दोन दिवस चांदोली व कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. वारणा तसेच कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे तेथील नदी काठच्या गावांना व तेथील रहिवासी असणाऱ्या नागरिकांना पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तेथील नागरिकांना दिलासा देण्यासाठी व पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आ. सुधीर दादा गाडगीळ यांनी त्या ठिकाणीची प्रत्यक्ष पाहणी केली. फक्त पाहणी न करता आ. सुधीरदादा युवा मंच च्या माध्यमातून सांगली मगरमच्च कॉलनी, काकानगर, सूर्यवंशी प्लॉट, कर्नाळ रोड येथील नागरिकांना त्यांचे साहित्य सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी ट्रक्टर व टेम्पो याची सोय उपलब्ध करून दिली. तसेच अंकली, जुनी धामणी, हरिपूर येथील नागरिकांसाठी मालू हायस्कूल, विलिंग्डन कॉलेज, याठिकाणी स्थलांतरीत ३०० हून अधिक पूरग्रस्तांसाठी जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. तसेच शामराव नगर, महादेव कॉलनी येथील जी कुटुंब स्थलांतरीत झालेली आहेत त्या कुटुंबातील सदस्य अजून हि त्याठिकाणाहून स्थलांतरीत झाले नाहीत त्यांच्या हि जेवनाची सोय युवा मंच माध्यमातून करण्यात आली. पाणी पातळीत वाढ झाल्यावर नागरिकांना तेथून बाहेर पडणे अडचणीचे ठरेल त्यासाठी त्यांना वेळीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करून आ. सुधीर दादा गाडगीळ यांनी त्यांची कार्य तत्परता व जनते प्रती काळजी परत एकदा निदर्शनास आणून दिली आहे.
तसेच सांगली येथील प्रभाग क्रमांक १२ मधील कर्नाळ रोड वरील काकानगर, साईनाथ नगर, बाळूमामा मंदिर, मगरमच्छ कॉलनी, जामवाडी व सूर्यवंशी प्लॉट या भागाची पाहणी करून तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्यासाठी आवाहन केले. व टिळक चौक, मारुती रोड येथील पूरबाधित भागाची पाहणी केली व परिस्थिती कितीही बिकट असली तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत. घाबरून जाऊ नका असेहि आ. गाडगीळ म्हणाले.
अंकली गावच्या तलाठी संगीता पाटील मडम यांच्याकडून अंकली व जुनी धामणी गावच्या पूरस्थितीची माहिती जाणून घेतली.व तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याची सूचना दिली. सांगली महानगरपालिका क्षेत्रातील पूरसदृश परिस्थिती लक्षात घेऊन पूरस्थितीची पाहणी व नागरिकांना स्थलांतरीत करण्यासाठी बोटींचीही व्यवस्था करण्यात आली. यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, युवा मंचचे विश्वजित पाटील, संघटन सरचिटणीस दीपक माने, गटनेते विनायक सिंहासने, नगरसेवक युवराज बावडेकर, सुब्राव मद्रासी, लक्ष्मन नवलाई, पै. पृथ्वीराज पवार, गौतम पवार, अमर पडळकर, चेतन माडगुळकर, अशरफ वांकर, कृष्णा राठोड, अमित देसाई, राहुल माने, अमित गडदे, शहाजी भोसले, इम्रान शेख, गणपती साळुंखे, तसेच युवा मंचचे पदाधिकारी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.