Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पूरग्रस्तांना जेवण वाटप

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पूरग्रस्तांना जेवण वाटप. 


महापुराचे पाणी ओसरायला सुरूवात झाल्यावर लोक आपल्या घराच्या ओढीने आपापल्या घरांची स्वच्छता करायला येतात पण घराचे झालेले विद्रूपीकरण बघुन हताश होऊन जातात पण काय करणार साफसफाई करून पुन्हा पुर्ववत होण्याशिवाय पर्याय नसतो मग अशावेळी त्यांना गरज असते मायेची आधाराची अशा परिस्थितीत जेवण बनविणे सुध्दा मुश्किल असते याचवेळी मायेचा आधार द्यायचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते या पक्षाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा ज्योती आदाटे आणि सरचिटणीस महिला आघाडी ची प्रियांका तुपलोंडे यांनी ज्या भागात अजुनही पाण्याने वेढा घातलाय अशा भागात जाऊन सर्वे केला हरिपुरलगत असलेल्या काळीवाट परिसरातील लोकांची दयनीय  अवस्था बघुन त्या लोकांना स्वतःहून जेवणबाबत विचारणा केली हे ऐकुन त्या भागातील लोकांना प्रचंड आनंद झाला जवळपास 100 कुटुंबियांना पुरेल इतकं रात्रीचे जेवण पुरविण्यात आले.त्या भागातीत नागरीकांनी आभार मानले ते म्हणाले आतापर्यंत आमची चौकशी करायला किंवा तुम्हाला जेवण हवे आहे का असे कोणी विचारले नाही स्वतःहून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे कार्यकर्ते येऊन चौकशी करतात आणि जेवण देतात हे बघुन आमच मन भरून आले आहे अशा प्रतिक्रिया देऊन आभार मानले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.