माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा कार्य म्हणून आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंच तर्फे कलाकारांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप
सांगली दिनांक २० जुलै २१ : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा कार्य म्हणून आ. सुधीरदादा गाडगीळ युवा मंच तर्फे कलाकारांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट चे वाटप करण्यात आले.
जवळपास तीन महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे. तसेच कित्येक महिन्यापासून सर्व प्रकारचे कार्यक्रम सभा संमेलन यावर बंदी घातली आहे. त्यामुळे कलाकार कोणतेही कार्यक्रम करु शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. प्रत्येकाला त्याच्या अडचणीत त्याला मदत करून त्याचे जीवन सुसह्य करणारे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी कलाकारांना मदत करण्याचा निर्णय घेतला. केवळ निर्णय घेऊन न थांबता प्रत्यक्षात कार्यवाही केली. यावेळी बोलताना आ. गाडगीळ म्हणाले, सध्या कोरोनामुळे सर्वजणच अडचणीत सापडले आहेत. त्यातून कलाकार हि सुटले नाहीत. त्यांचे सर्व कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे त्यांना मदत देणे हे आमचे कर्तव्य आहे. असे सांगून पुण्याप्रमाणे एखादा ऑन लाईन कार्यक्रम करता येतो का ते पाहून असा कार्यक्रम आयोजित करू असे सांगितले. आर्टिस्ट संघटनेचे अध्यक्ष अतुल शहा यांनी आ. गाडगीळ यांनी कलाकारांची अडचण ओळखून केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना हि मदत अत्यंत मोलाची आहे. कलाकार अन्य कामे करू शकत नाहीत असे सांगितले. याप्रसंगी आर्टिस्ट संघटनेतर्फे आ. गाडगीळ यांना आभार पत्र देण्यात आले.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रदेश सदस्य नगरसेवक शेखर इनामदार, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, दीपक माने, शरद शहा, धनंजय गाडगीळ, आनंद कमते, राजेंद्र कानिटकर, विश्वजित पाटील यांच्यासह अन्य कलाकार व पदाधिकारी उपस्थीत होते. सूत्रसंचालन रश्मी सावंत यांनी केले. गणपती साळुंखे यांनी आभार मानले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.