कोरोंनाचे सर्व नियम पाळून व्यापार व उद्योग खुला करायची परवानगी द्यावी सर्व व्यापारी संघटनाची पालक मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी.
आज सांगली मध्ये महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त इतर व्यवसाय व उद्योग सुरु ठेवण्याकरिता व कोरोना चे नियम कसे पाळले जातील त्याकरिता व्यापाऱ्यांची भूमिका जाणून घेण्याकरिता पालकमंत्री जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार सर्व व्यापारी असोसिएशनच्या प्रमुख पदाधिकाऱ्याची सांगली येथे बैठक पार पडली सदर बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज,माजी महापौर सुरेश पाटील, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शेखर माने यांनी आयोजित केली होती त्यामध्ये व्यापाऱ्यांनी सांगली बाजारपेठेतील व्यापार गेली तीन महिने ठप्प असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे तरी शासनाने नियमांमध्ये दुरुस्ती करून बाजारपेठ सुरू करावी अशी प्रामुख्याने पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला. त्यामध्ये व्यापारी असोसिएशन आपापल्या असोशियन तसेच पेठांमध्ये कोरोना नियमाचे पालन व्हावे याकरिता प्रशासनास सर्व सहकार्य करतील असे हमी व्यापारी यांच्याकडून देण्यात आली तसेच रस्त्यावरची गर्दी टाळण्याकरिता बाजारपेठेमध्ये नो ऑफर्स झोन राबवण्याची मागणी करण्यात आली सांगलीची बाजारपेठ खुली व्हावी याकरिता संजय बजाज सुरेश पाटील व शेखर माने यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना आग्रहाची विनंती केली. त्यावर पालकमंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच,मुख्य सचिव यांच्याशी चर्चा करून व्यापार सुरू करण्या संदर्भात सकारमक्ता दाखवली. सदर बैठकीस चेंबर ऑफ कॉमर्स सांगली. सांगली शहर सराफ असोसिएशन. कापड पेठ असोसिएशन. रेडिमेड गारमेंट असोसिएशन. मेन रोड असोसिएशन. गणपती पेठ असोसिएशन. मोबाईल शॉपी असोसिएशन. ऑटोमोबाईल असोसिएशन. पानपट्टी असोसिएशन. भांडी व्यापारी असोसिएशन. सायकल विक्री असोसिएशन. गणेश मार्केट. किराणा भुसार असोसिएशन. चे प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.