Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तळियेत दाखल; नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी

 राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तळियेत दाखल; नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी


रत्नागिरी : कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्तहाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यातील इतरही महत्वाच्या नेत्यांनी पुरग्रस्त व दरडग्रस्त भागांची पाहणी केली आहे. त्यानंतर आज राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दरड कोसळुन उध्वस्त झालेल्या तळिये गावात दाखल झाले आहेत.

नागरिकांना जोरदार पावसामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, तसेच अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता सरकारकडुन नागरिक मदतीची अपेक्षा करत आहेत. महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

मुख्यमंत्री यांनी अहवाल आल्यानंतर योग्य ती मदत करण्यात येईल, असं आश्वासन नागरिकांना दिलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबरोबर भाजप नेते आशिष शेलार तसेच पालकमंत्री आदिती तटकरे यादेखील उपस्थित आहेत. तळिये गावातील दुर्घटनेत मृत झालेल्यांना राज्यपालांनी पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान, कोकणासह महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे आतापर्यंत तब्बल 140 जणांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच अनेक जण बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यतादेखील व्यक्त करण्यात येत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.