जतचे माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांचे निधन
जतचे माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांचे 87 व्या वर्षी अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले. त्यांची गेल्या चार दिवसापासून प्रकृत्ती खालावली होती. त्यामुळे सांगली येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना मंगळवारी त्यांची प्राणज्योत मावळली.
लोकहिताची तळमळ पंधरा वर्षे आमदार
1985 सालची गोष्ट आहे. विधानसभा निवडणूक जवळ होती. एक दिवस जत तालुक्यातील लोक वसंतदादा पाटील यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले, 'आमच्या तालुक्यातील मिल्ट्रीवाला लोकांच्यासाठी काम करतोय. त्याला तिकीट द्या." माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांचे पार्थिव दुपारी 4 ते 6 या वेळेत जत येथील सनमडीकर हॉस्पिटल येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायकांळी 7.00 वाजता सनमडी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दादा त्यांना म्हणाले, 'त्या मिल्ट्रीवाल्याला माझ्याकडे घेऊन या.' मग उमाजीराव सनमडीकर दादांना नागेवाडीत भेटले. तिथं माळावर उभे राहून दादांनी शब्द देत सांगितले, तू जा. तुझे तिकीट फायनल आहे. तयारीला लाग. त्यानंतर थेट सनमडीकर काका निवडणुकीत उभे राहिले आणि लोकांच्या अपार प्रेमामुळे आमदार झाले."
भारतीय सैन्यदलात शिपाई, हवालदार, नायक या पदावर काम केलेले आणि 1985 साली जत विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांच्या जीवनाचे पैलू अकालनीय आहेत. जत तालुक्यातील सनमडी या गावात सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झालेले. सनमडीकर काका सामाजिक क्षेत्रातील कामामुळे आमदार पदापर्यंत पोहचू शकले. त्यांचे वडील मरीआई देवीचे पुजारी होते.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत उमाजी सनमडीकर यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले. नंतर 1962 साली सैन्यात दाखल झाले होते. भारतीय सैन्यदलातील शिपाई ते आमदार असा माझा प्रवास झाला. 1985,90 आणि 2004 साली असं तीन वेळा मी आमदार झालो. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मला महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली." असे सनमडीकर काका कायम सांगत असायचे.
जत साखर कारखाना उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते. त्याशिवाय सिध्दार्थ शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करून त्यांनी पाच आश्रमशाळा उभारून त्यांनी गोरगरिब नागरिकांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय केली आहे. तेथे पॉलिटेक्निक, इंग्लिश मेडियन स्कूल, नर्सिंग कॉलेज अशा संस्था उभारून तालुक्यातील हाजारो विद्यार्थ्यांची शिक्षणांची सोय केली आहेच, त्याचबरोबर शेकडो तरुणांच्या हाताला या संस्थाच्या माध्यमातून काम मिळवून दिले आहे. त्याशिवाय म्हैसाळ सिंचन योजनेसह तालुक्यातील अनेक विकासकामे खेचून आणून त्यांनी तालुक्यातील विकासाला महत्व दिले होते. अखेरच्या क्षणापर्यत ते लोंकाची नाळ जुळलेले आमदार राहिले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.