यूजीसीकडून गाईडलाईन्स जारी, विद्यापीठ,कॉलेज 1 ऑक्टोबर पासून सुरु करा
नवी दिल्ली: विद्यापीठ अनुदान आयोगानं येत्या शैक्षणिक वर्षाचं कॅलेंडर जारी केलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे यंदाही शैक्षणिक वर्ष उशिरा सुरु होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानं दिलेल्या सूचनांप्रमाणं शैक्षणिक वर्ष 1 ऑक्टोबर पासून सुरु करण्यात येईल. यूजीसीनं या संदर्भात मार्गदर्शक सूचा देखील जारी केल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु करताना समन्वय ठेवण्यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठांना निर्देश देण्यात आले आहेत. पहिल्या वर्षाचे प्रवेश 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
30 सप्टेंबरपर्यंत पहिल्या वर्षांचे प्रवेश पूर्ण करा
विद्यापीठ अनुदान आयोगानं दिलेल्या माहितीनुसार 2021-22 या शैक्षणिक सत्रामध्ये पदवी आणि इतर अभ्यासक्रमांचे पहिल्या वर्षांचे प्रवेश 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करावे लागतील. तर, त्या मुदतीनंतर रिकाम्या राहिलेल्या जागांवर विद्यार्थ्यांना 31 ऑक्टोबर पर्यंत प्रवेश दिले जाऊ शकतात. देशातील सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी 1 ऑक्टोबर पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु करावेत असे आदेश दिले आहेत.
परीक्षा 31 ऑगस्ट पूर्वी संपवा
विद्यापीठ अनुदान आयोगांनं विद्यापीठ आणि महाविद्यालयांना राहिलेल्या सर्व परीक्षा 31 ऑगस्ट पूर्वी संपवा, असे आदेश दिले आहेत.
12 वीचे निकाल 31 जुलैअखेर लागण्याची आशा
विद्यापीठ अनुदान आयोगानं बारावी परीक्षांचे निकाल 31 जुलैपूर्वी जाहीर होतील, अशी आशा व्यक्त केली आहे. देशातील सर्व बोर्ड बारावीचे निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया 30 सप्टेंबर पूर्वी पूर्ण करावी, असं सांगण्यात आलं आहे. सेमिस्टर परीक्षा कधी घ्यायची संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार विद्यापीठांना देण्यात आले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.