बारामतीत स्टॅम्प पेपरचा काळाबाजार; कृत्रिम तुटवडा निर्माण करून पेपरची चढ्या दराने विक्री
सांगवी: बारामती तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत जात आहे. शहरात ५ रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंतचे स्टॅम्प पेपरचा काळाबाजार व कृत्रिम तुटवडा निर्माण करून स्टॅम्प पेपरची चढ्या दराने विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे गोरगरीब जनतेची लूट करत काही परवानाधारक मुद्रांक विक्रेते स्वत:चे उखळ पांढरे करून आहेत.
तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक स्टॅम्प खरेदी साठी येत असतात. स्टॅम्प पेपर विक्रेते, दुकानांतच झेरॉक्स, टायपिंगचे दस्ताऐवज बनवण्याची सक्ती नागरिकांकडे करत असल्याचे प्रकार घडत आहेत. अनेकदा स्टॅम्प संपले अशा उत्तरांनी मुद्रांक विकेत्यांनी स्थानिक जनतेला वेठीस धरले जात आहे. सर्वसामान्य जनता वगळता महत्त्वाच्या व ओळखीच्या व्यक्तींनाच मुद्रांक सहज उपलब्ध होत आहेत. स्टॅम्प पेपर असूनही ते देण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार निबंधक यांच्याकडे वारंवार केल्या जात आहेत. शासकीय कार्यालयांशी निगडीत प्रतिज्ञापत्र, संमतीपत्र, अॅफिडेव्हीट आदी शासकीय कामकाजासाठी आवश्यक कोर्ट फी स्टॅम्प व स्टॅम्प पेपर मात्र मूद्रांक विक्रेत्यांकडे उपलब्ध होत नाही. त्याचा फायदा घेवून काही दलालांनी कोर्ट फी आणि स्टॅम्पची काळया बाजारात विक्री करून पैसे कमवण्याचा उद्योग जोरात चालवला आहे.
१०० रुपयांचा स्टॅम्प चढ्या भावाने १५० रुपयांना
१०० रुपयांचा स्टॅम्प पेपरचा तुटवडा भासत आहे. नागरिक स्टॅम्प वेंडरकडे गेल्यास स्टॅम्प पेपर नसल्याचे सांगितले जाते. सर्वसामान्य माणसांसाठी उपलब्ध नसलेला स्टॅम्प पेपर संबंधित काम एजंट अथवा स्टॅम्प वेंडरच्या दुकानातून करायचे असल्यास उपलब्ध होत आहे. स्टॅम्प पेपरचा तुटवडा होणार नाही. याची कल्पना स्टॅम्प वेंडर, एजंट लोकांना असल्याने मोठ्या प्रमाणात स्टॅम्प खरेदी करून ठेवतात. यामुळे तुटवडा झाल्याचे सांगितले जाते. विविध कामांसाठी स्टॅम्प लागत असल्याने दुकानांत खेटे मारावे लागत आहेत. प्रतिज्ञापत्रावरचा मजकूर टायपिंग करण्यासाठी संबंधित वेंडर, एजंट च्या दुकानात करायचा असल्यास पेपर लगेच उपलब्ध होतात. तसेच १०० रुपयांचा स्टॅम्प चढ्या भावाने १५० रुपयांना विकत असल्याने या प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.