Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महिलांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे : शशिकला गावडे

 महिलांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे  : शशिकला गावडे    


पेस्टिसाइड व रासायनिक खतांचा वापर कमी करीत महिलांनीच नैसर्गिक शेतीकडे वळावे शेतीचा शोध मुळात स्त्रीने लावला असल्यामुळे शेतीमधील परंपरागत आणि  नावीन्यपूर्ण तंत्राचा वापर करीत नैसर्गिक शेतीला प्रतिष्ठा मिळवून द्यावी  असे आवाहन शशिकला गावडे यांनी केले  झलकारी महिला ग्राम संघ आरग यांच्यावतीने परसबाग प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते यावेळी त्या बोलत होत्या.       

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान योजनेअंतर्गत मिरज पंचायत समितीच्या वतीने महिलांच्या स्वयंसहायता समूहाकडून परसबाग लागवड करून घेतली जात आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून आरगेतील स्वयंसहायता समूहातील महिलांना परसबाग लागवडीचे  मार्गदर्शन व्हावे याकरता झलकारी ग्रामसंघ आरग यांच्यावतीने परस बागेचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. पुढे त्या असेही म्हणाल्या,  मुळात शेतीचा शोध निवृत्ती मातेने म्हणजे महिलेने लावला असल्याचे सांगत पर्यावरण पूरक शेती केली पाहिजे, याकरता पेस्टिसाइड व रासायनिक  खतांचा वापर कमी करत पारंपारिक व नावीन्यपूर्ण तंत्रांचा वापर करून नैसर्गिक शेती केली पाहिजे. यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन आपापल्या परसबागेत विविध प्रकारच्या फळभाज्या व पालेभाज्यांची लागवड करावी .  या करता महाराष्ट्र राज्य शासनाने आखून दिलेल्या गाईडलाईन चा वापर करावा व सर्वच स्वयंसहायता समूहातील महिलांनी आपापल्या गटामार्फत किंवा वैयक्तिक सुद्धा परसबागा उभारावेत  असे आवाहन शशिकला गावडे यांनी केले. यावेळी झलकारी ग्रामसंघाच्या अध्यक्षअधिका बाबर यांच्या प्लॉटवर परस बागेचे गादीवाफे बनवून बियाण्यांची लागवड करण्यात आली. यावेळी शिवशक्ती,  हिरकणी, संविधान, सृष्टी, सरस्वती, समर्थ या स्वयंसहायता समूहाच्या अध्यक्ष सचिव व माहिला उपस्थित  होत्या.  यावेळी स्वागत झलकारी ग्रामसंघ अध्यक्षअधिका यांनी केले, तर आभार संविधानच्या मधुमती आवळे यांनी केले. या विभागाच्या रेश्मा सातपुते यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. यावेळी रेखा खटावे, अश्विनी पाटील, सारिका कवाळे, उज्वला नीळकंठ, लता कांबळे, शितल कांबळे, विना सारवाडे यानी संयोजन केले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.