Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शरद पवार यांची पुरग्रस्तांसाठी मोठी घोषणा; 16 हजार कुटुंबांना मदत

 शरद पवार यांची पुरग्रस्तांसाठी मोठी घोषणा; 16 हजार कुटुंबांना मदत


मुंबई - महाराष्ट्रातील 15 जिल्हय़ांना महाप्रलयाचा जबरदस्त फटका बसला आहे. लोकांनी आपली घरे, व्यवसाय, संसार, कपडे-धान्य गमावले आहे. त्यांना सहस्र हातांनी मदत व्हायला हवी. राज्यातील पूरपरिस्थितीने सगळय़ांनाच हादरवून सोडले आहे. उद्ध्वस्त झालेली घरेदारे पुन्हा उभी करण्यसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टमार्फत 16 हजार पुरग्रस्त कुटुंबांना मदत केली जणार त्यांनी आज घेतलेल्या पत्रकारपरिषदेत सांगितले आहे.

राज्यात सहा जिल्ह्यात जवळपास 16 हजार कुटुंबांना फटका बसला आहे. या कुटुंबियांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टमार्फत मदत केली जणार आहे. 16 हजार कुटुंबासाठी 16 हजार किट्सचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये भांडी, मास्क, पांघरुन आणि इतर जीवनावशक वस्तूंचा समावेश असेल. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूरग्रस्त भागात वैद्यकीय पथके पाठवली जाणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. ते मुंबईतील राष्ट्रवादी भवनातून पत्रकारांशी बोतल होते.

महाड, पोलादपूरमध्ये तर जीवनाचा कडेलोटच झाला. तळीये गावावर डोंगर कोसळला. त्यात पन्नासच्या आसपास लोकांनी जीव गमावला. तितकेच लोक बेपत्ता आहेत. साताऱयात विविध ठिकाणी ढिगाऱयांखाली 31 जीव प्राणास मुकले. कोल्हापूर, सांगलीत पूरपरिस्थितीने चिंता निर्माण केली आहे. अर्धे कोकण दरडग्रस्त आणि जमीनदोस्त झाल्याचे चित्र विदारक आहे. महाराष्ट्रातील 15 जिल्हय़ांना महाप्रलयाचा जबरदस्त फटका बसला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, जळगाव, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नगर, अमरावती, भंडारा, रत्नागिरी, रायगड आणि मुंबईतील काही भागांवर पावसाने कोप केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.