सांगली - डॉक्टर महिलेस पैशासाठी सासरी मानसिक व शारीरिक छळ
डॉ मधुरा कुलकर्णी पाटील यांची व्यथा सांगलीतील एका सुशिक्षित कुटुंबातील करूण कहाणी---डॉ मधुरा या महिलेने काही वर्षांपूर्वी सांगलीतील अर्जुन सुनील पाटील याच्याशी प्रेम विवाह केला सुरुवातीला काही दिवस दोघांचाही संसार चांगला चालला परंतु नंतर पती अर्जुन पाटील दारू पिऊन घरी येऊ लागला पत्नी डॉ मधुरा हिला त्रास देऊ लागला त्या वेळी सासरे सुनील पाटील यांच्या कडे तिने तक्रारही केली पण काही उपयोग झाला नाही नंतर पती अर्जुन याचे दारूचे व्यसन वाढत गेले खर्च करण्यासाठी वारंवार पत्नी डॉ मधुराला मारहाणही होऊ लागली पण डॉ मधुरा ने त्यावेळी सर्व सहन केले पण हळूहळू हे प्रकार वाढतच गेले त्याच बरोबर पाटील कुटुंबही तिच्या तक्रारींकडे कानाडोळा करू लागले आणि जणू डॉ मधुरा आपली सून नाहीच असाही आव अनु लागले त्यानंतर डॉ मधुराने आपल्या नवऱ्याच्या व्यवसायासाठी मदतही देऊ केली पण सर्व व्यर्थ ठरले.
त्यानंतर डॉ मधुरा या गरोदर असल्याची बातमी तिने आपल्या पतीला सांगितली पण त्यातही आपल्याला जुळे होणार आहे असे सांगितल्यावर तिच्या पतीने तिला माझी आपण एकच आपत्य ठेऊ दोन नकोत आणि मला पहिला मुलगाच पाहिजे असा हट्ट करत मारहाण करण्यास सुरुवात केली डॉ मधुरा या गरोदर असताना तिला तिच्या पतीने मारहाण केली, डॉ मधुरा यांना दोन जुळ्या मुली झाल्यावर तर चक्क या पाटील कुटुंबाने या मुली पती अर्जुन याच्या नाहीतच असा निर्लज्ज अविर्भाव आणला त्यामुळे नाईलाजाने डॉ मधुरा यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे पैशासाठी आपल्याला आपल्या सासरी लाथाबुक्क्यानि मारहाण झाल्याचे फिर्यादीत म्हणले आहे त्यानुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यात पतीसह चौघां विरोधात कौटुंबिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास श्री तपास अधिकारी सहा पोलीस निरीक्षक अमित पाटील विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.