राज कुंद्राच्या साथीदाराचा अजब दावा ;पॉर्न नव्हे न्यूड फिल्म तयार करायचो.
मुंबई 27 जुलै : सध्या संपूर्ण देशात राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणाचीच चर्चा आहे. या प्रकरणात आतापर्यंत 11 जणांना अटक झाली आहे. अन् प्रत्येकाची कसून चौकशी केली जात आहे. या दरम्यान तनवीर हाश्मी याने एक चकित करणारा दावा केला. "आम्ही अॅडल्ट किंवा पॉर्न फिल्म बनवत नव्हतो तर न्यूड फिल्म्सची निर्मिती करत होतो." असं म्हणत त्याने करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
पॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन-पूनमला कोर्टाचा दिलासा; दिला महत्त्वाचा निर्णय
पाहूया तनवीर नेमकं म्हणाला तरी काय ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तनवीर हा राज कुंद्रासाठी काम करत होता. त्यामुळे त्याने दिलेली माहिती पोलिसांसाठी अत्यंत महत्वाची होती. त्या माहितीच्या आधारावर राजविरोधात आणखी पुरावे सापडणार होते. त्यामुळे सलग तीन तास त्याची चौकशी करण्यात आली. मात्र त्याने चौकशीदरम्यान अजबच दावे केले.
दिल, दोस्ती आणि लग्न! सखी गोखले कशी पडली सुव्रत जोशीच्या प्रेमात?
तो म्हणाला, "आम्ही अॅडल्ट किंवा पॉर्न फिल्म बनवत नव्हतो तर थोडी फार न्यूडिटी असलेल्या सीरिज निर्माण करत होतो." अशा प्रकराच्या दृश्यांना सॉफ्ट पॉर्न असं म्हटलं जातं. तनवीर सध्या जामिनावर आहे आणि त्याला राज कुंद्रा प्रकरणाबाबत चौकशीसाठी रविवारी बोलावले होते. चौकशीवेळी त्याला विचारले की राज कुंद्राला तो कधी भेटला होता का, त्यावर त्याने राजला कधीही भेटले नसल्याचे सांगितले. त्याने आणि कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांनी दिलेल्या उत्तरांमध्ये विसंगती जाणवत असल्यामुळे त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.