Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे महापुरात युद्धपातळीवर मदतकार्य

 पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे  महापुरात युद्धपातळीवर मदतकार्य


सांगली, दि. २३ : सांगली शहर आणि आसपासच्या गावांत कृष्णा नदीच्या महापुराचे पाणी घुसू लागताच पृथ्वीराज  पाटील फाउंडेशन आणि सांगली शहर जिल्हा काँग्रेसची टीम पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी युद्ध पातळीवर कार्यरत राहिली आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील स्वतः कार्यकर्त्यांसमवेत पूरग्रस्त भागातील लोकांच्या मदतीसाठी धावले आहेत.

श्री. पृथ्वीराज पाटील यांनी आज दिवसभरात मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, गणपती पेठ, गवळी गल्ली, काकानगर, सांगलीवाडी, हरिपूर रोड, भारतनगर, सिद्धार्थ नगर परिसर, आणि शहरातील आणखी काही भागांत जाऊन पूरग्रस्त लोकांसाठी मदतकार्य केले, त्यांची विचारपूस केली. 

पूरग्रस्त भागातील लोकांना बाहेर काढून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी पृथ्वीराज पाटील फाउंडेशन आणि पक्षाचे कार्यकर्ते टेम्पो, बस आणि ॲम्बुलन्स घेऊन मदतीसाठी धावले  आहेत. लोकांना तातडीची मदत व्हावी, यासाठी हेल्पलाइनही सुरू करण्यात आली आहे.

पूरपरिस्थिती संदर्भात बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले, पुराचा ताजा आढावा घेऊन लोकांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठी आमची टीम दिवसरात्र कार्यरत राहणार आहे. २०१९ च्या महापुरातही या टीमने अत्यंत चांगल्या प्रकारे काम केले होते. त्याच पद्धतीने यंदाही ही टीम लोकांच्या उपयोगी पडेल.

महापुराची स्थिती अत्यंत गंभीर असून पाणी वाढतच चालले आहे. अशावेळी लोकांनी, व्यावसायिकांनी सावध राहावे, तसेच वेळीच घराबाहेर पडावे. त्यासाठी तातडीची मदत लागल्यास आमच्या हेल्पलाइनशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.

हेल्पलाईन क्रमांक : 95884 13100, 98228 82861, 98346 75660, 70201 82944


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.