लवकरच स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल? मात्र आज दर रेकॉर्ड स्तरावर
नवी दिल्ली, 20 जुलै: सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. राजधानी दिल्लीसह देशभरातील शहरात आज पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. यामुळे आज सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी किंमती अद्यापही सामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत. शनिवारी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 30 पैशांनी वधारले होते. यानंतर याठिकाणी पेट्रोलचे दर 101.84 रुपये प्रति लीटरच्या स्तरावर पोहोचले आहेत. शनिवारी डिझेलच्या किंमती दिल्लीत स्थिर होत्या.
मे महिन्यापासून सातत्याने इंधनाच्या दरात वाढ होत आहे. 42 दिवसात पेट्रोल 11.52 रुपये प्रति लीटरने महागले आहे. जुलै महिन्याबाबत बोलायचे झाले तर पेट्रोलच्या दरात 9 वेळा वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात पाच वेळा घसरण झाली आहे.
लवकरच स्वस्त होणार पेट्रोल
पेट्रोल-डिझेलच्या दरात लवकरच घसरण होण्याची शक्यता आहे. रविवारी ओपेक समुहासह झालेल्या बैठकीनंतर अशी अपेक्षा केली जात आहे लवकरच पेट्रोल स्वस्त होऊ शकतं. या बैठकीत झालेल्या कराराअंतर्गत पाच ओपेक आणि नॉन-ओपेक देश ऑगस्टपासून कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवतील. यापूर्वी तेलाच्या किंमतींवर या देशांमधील वादाचा परिणाम झाला होता.
याठिकाणी मिळतंय सर्वात महाग पेट्रोल
आज सर्वात महाग पेट्रोल गंगानगर आणि मध्य प्रदेशमधील अनुपपूरमध्ये मिळत आहे. गंगानगरमध्ये पेट्रोलचे दर 113.21 रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर 103.15 रुपये प्रति लीटर आहेत. अनुपपूरमध्ये आज पेट्रोलचा भाव 112.78 रुपये आणि डिझेलचा भाव 101.15 रुपये प्रति लीटर आहे. महाराष्ट्रात इंधनाचे सर्वात जास्त दर परभणीमध्ये असतात. परभणीमध्ये आज पेट्रोलचे भाव 109.73 रुपये तर डिझेलचा दर 97.80 रुपये प्रति लीटर आहे.
दररोज सकाळी 6 वाजता बदलतात इंधनाचे दर
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.
असे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर
पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
पेट्रोल-डिझेलचे आजचे दर
* दिल्ली - पेट्रोल 101.84 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लीटर
* मुंबई - पेट्रोल 107.83 रुपये और डीजल 97.45 रुपये प्रति लीटर
* चेन्नई - पेट्रोल 102.49 रुपये आणि डिझेल 94.39 रुपये प्रति लीटर
* कोलकाता - पेट्रोल 102.08 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लीटर
* बंगळुरु - पेट्रोल 105.25 रुपये आणि डिझेल 95.26 रुपये प्रति लीटर
* लखनऊ -पेट्रोल 98.69 रुपये आणि डिझेल 90.26 रुपये प्रति लीटर
* पाटणा - पेट्रोल 104.57 रुपये आणि डिझेल 95.81 रुपये प्रति लीटर
* भोपाळ - पेट्रोल 110.20 रुपये आणि डिझेल 98.67 रुपये प्रति लीटर
* जयपूर - पेट्रोल 108.71 रुपये आणि डिझेल 99.02 रुपये प्रति लीटर
* गुरुग्राम - पेट्रोल 99.46 रुपये आणि डिझेल 90.47 रुपये प्रति लीटर
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.