स्वदेशी PUBG अधिकृतपणे लाँच; अशाप्रकारे करा Battlegrounds Mobile India (BGMI) प्ले स्टोरमधून डाउनलोड
अखरेसी Battlegrounds Mobile India गेम भारतीयांसाठी अभिकृतपणे उपलब्ध झाला आहे. भारतीय अँड्रॉइड युजर्स प्ले स्टोरवर जाऊन आजपासून PUBG चा भारतीय अवतार म्हणजे Battlegrounds Mobile India डाउनलोड करू शकतात. 2 जुलै सकाळी 6 वाजून 30 मिनीटांनी Battlegrounds Mobile India भारतात अधिकृतपणे लाँच करण्यात आला आहे. सध्यातरी या गेमचा आनंद फक्त अँड्रॉइड युजर्सना घेता येईल. आयओएस युजर्सना अजून काही दिवस वाट बघावी लागणार आहे. (Battlegrounds Mobile India (BGMI) official version available for download on Google Play Store)
Battlegrounds Mobile India (BGMI) प्ले स्टोरवरून अशाप्रकारे करा डाउनलोड तुम्ही Battlegrounds Mobile India चा अधिकृत व्हर्जन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला Play Store वर जावे लागेल. प्ले स्टोरमध्ये 'Battlegrounds Mobile India' असा सर्च करा. त्यानंतर हा गेम तुमच्या फोनमध्ये इंस्टाल करा. जर तुमच्या फोनमध्ये गेमचा अर्ली अॅक्सेस व्हर्जन असेल तर हा गेम अपडेट करण्याचा पर्याय देण्यात येईल. गेम अपडेट केल्यावर तुम्ही बीटा व्हर्जनवरून अधिकृत व्हर्जनवर अपडेट व्हाल.
हा गेम स्मार्टफोन डाउनलोड करण्यासाठी तुमच्या फोनमध्ये Android 5.1.1 च्या वरील ऑपरेटिंग सिस्टम असणे आवश्यक आहे. तसेच फोनमध्ये कमीत कमी 2GB रॅम असावा, असे डेव्हलपर कंपनी क्रॉफ्टनने सांगितले आहे. BGMI च्या अधिकृत गेम फाईलची साईज 721MB आहे. हा गेम 18 जून रोजी बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध झाला होता, बीजीएमआयच्या अर्ली अॅक्सेस वर्जनचे 50 लाख डाउनलोड पूर्ण झाले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.