शेतकऱ्यांसाठी उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकारकडून नवीन प्लॅटफार्म; जाणून घ्या, उत्पन्न कसे वाढणार?
नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मोदी सरकारने डिजिटल प्लॅटफॉर्म किसान सारथी हे सुरू केले आहे. या डिजिटल प्लॅटफार्मवर शेतकऱ्यांना पीक व इतर बाबींची माहिती दिली जाईल.
या प्लॅटफॉर्मच्या साहाय्याने आता शेतकऱ्यांना वेळेत पूर्ण माहिती मिळू शकेल, तीदेखील त्यांच्याच भाषेत तसेच या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे शेतकरी आपले पीक आणि भाजीपाला योग्यरित्या बाजारात विकू शकतील. दरम्यान, कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एकत्रितपणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे किसान सारथी या डिजिटल प्लॅटफार्मचे लाँचिंग केले.
यावेळी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकरी थेट वैज्ञानिकांकडून शेती व त्यासंबंधित क्षेत्रातील वैयक्तिक सल्ला घेऊ शकतात. शेतकर्यांचे धान्य त्यांच्या शेतात, गोदामे, बाजारपेठेत आणि इतर ठिकाणी पोचविण्याच्या क्षेत्रात नवीन तांत्रिक हस्तक्षेपांवर संशोधन केले पाहिजे, त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल कमी खर्चात विकून शकतील, असे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना Kisan Sarathi चा काय फायदा?
डिजिटल प्लॅटफार्म Kisan Sarathi च्या सहाय्याने शेतकऱ्यांना चांगले पीक, योग्य प्रमाणात उत्पादन आणि इतर अनेक मूलभूत गोष्टींची माहिती मिळू शकेल. शेतकरी पिकाशी संबंधित कोणतीही माहिती थेट वैज्ञानिकांकडून डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे घेऊ शकतात. तसेच, शेतकरी हे शेतीच्या नवीन पद्धती शिकू शकतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.