Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दारुच्या आहारी गेलेल्या आईची लेकाकडून हत्या, वसईतला संतापजनक प्रकार

 दारुच्या आहारी गेलेल्या आईची लेकाकडून हत्या, वसईतला संतापजनक प्रकार



सई, 21 जुलै: मुंबईनजीक असणाऱ्या वसई  याठिकाणी एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका तरुणानं आपल्या आईची निर्घृण हत्या  केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आईला दारूचं व्यसन असून ती सतत दारूच्या नशेत असते, या कारणातून 18 वर्षीय तरुणानं ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

18 वर्षीय आरोपी तरुण आपल्या 59 वर्षीय आईसोबत वसईच्या कोळीवाडा परिसरातील आयशा अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला आहे. तर मृत 59 वर्षीय महिलेला दारूचं व्यसन होतं. मागील बऱ्याच काळापासून मृत महिला दारूच्या आहारी गेली होती. आपली आई सतत दारुच्या नशेत असते, ही बाब 18 वर्षीय मुलाला सतत खटकत होती. यामुळे दोघांत अनेकदा छोटे-मोठे वाद होतं होते. पण आईचं दारूचं व्यसन काही सुटत नव्हतं.

मंगळवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास मृत महिला दारुच्या नशेत होती. यामुळे मायलेकामध्ये पुन्हा वाद झाला. या वादानंतर संतापलेल्या तरुणानं आपल्या आईची निर्घृण हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच वसई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे. यानंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास वसई पोलीस करत आहेत.

दारूच्या व्यसनातून साताऱ्यात पत्नीची हत्या

दुसरीकडे, साताऱ्यात देखील अशीच एक घटना समोर आली आहे. पत्नीला दारूचं व्यसन असल्यानं एका तरुणानं लाकडी दांड्यानं मारहाण करत तिची हत्या केली आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून पत्नीला दारूचं व्यसन होतं. हे पतीला आवडतं नव्हतं. यामुळे पती पत्नीत सतत वाद व्हायचे. याच रागातून पतीनं आपल्या पत्नीला लाकडी दांड्यानं मारहाण केली. या मारहाणीत एक वार डोक्यावर लागल्यानं पत्नीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.