Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मेथे गुरुजींची जयंती आणि डॉ. ऋतुराज मेथे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा

मेथे गुरुजींची जयंती आणि डॉ. ऋतुराज मेथे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा


मिरजेतील जेष्ठ नेते जोतिराम मेथे यांचा स्मृतिदिन आणि युवा कार्यकर्ते धनराज संजय मेथे यांच्या वाढदिवसाचे नभ औचित्य साधून वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी व उपचार तसेच गरीब आणि गरजूना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, पोलिस आणि रिक्षाचालकाना मास्क व स्नॅनिटायझर्चे वाटप असे विविध उपचार राबवण्यात आले. -

मिरजेतील जेष्ठ नेते अनिलभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते प्रताप विद्यालय आवारात वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली नंतर मोफत आरोग्य तपासणी व उपचार तसेच रक्तदान शिबिराचे उद्घाटन रेल्वे पोलीस निरीक्षक संभाजी काळे आणि श्रीकांत येदूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जेष्ठ नेते सुरेश आवटी बापू, माजी उपमहापौर प्राचार्य डॉ. राजेंद्र मेथे, संजय मेथे पृथ्वीसिह नाईक, पृथ्वीराज पाटील यानी शिबीराला भेट देऊन स्तुत्य उपक्रमांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर समाजात अनेकजण बेरोजगार झाले आहेत. हे लक्षात घेऊन दिव्यांग बांधवांना जीवन आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. नगरसेवक निरंजन आवटी युवा नेते पृथ्वीराज पवार, जनसुराज्य जनसुराज्य पक्षाचे समित कदम, डॉ.ऋतुराज मेथे मोहन व्हनखंडे,डॉ. सुरेख पाटील, यावनी सुमित ठाणेदार शिवसेनेचे नेते किरण रजपुत आदि मान्यवरांच्या हस्ते या कीटचे वाटप करण्यात आले.

यावेळी  डॉ पृथ्वीराज मेथे,डॉ.ऋतुराज मेथे, डॉ. नम्रता मेथे डॉ. श्रीधर आवटी, डॉ. प्रियांका मेथे, या डॉक्टरांनी मोफत तपासणी करुन गरजेनसार रुग्णाना मोफत औषधे दिली. मिरज वाहतूक शाखा रिक्षा संघटना, रेल्वे पोलीस या सर्वांना मान्यवरांच्याहस्ते मास्क व सॅनिटायझर व फिल्ड वाटप करण्यात आले अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अभिजीत शिंदे, जेष्ठ मार्गदर्शक नेताजी मामा सुरवंशी, धनंजय भिसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.