मारुतीने पुन्हा एकदा हुंडाईला मागे टाकत पटकावले अव्वलस्थान
मुंबई : पुन्हा एकदा नंबर वनचा किताब देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी ने पटकवला आहे. कंपनीची मारुती सुझुकी व्हॅगनर देशात सर्वात जास्त विकणारी कार बनली आहे. गेल्या महिन्यात जिथे हुंडाई क्रेटा पहिला क्रमांक पटकावला होता, त्यानंतर व्हॅगन आरने क्रेटाला मागे टाकत पुन्हा एकदा अव्वल क्रमांक पटकावला आहे. मारुतीचा अव्वल नंबर क्रेटाने हिसकावून घेतला होता, अशातच पुन्हा एकदा विक्रमी विक्रीसह मारुती सुझुकीच्या व्हॅगन आरने देशात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या गाड्यांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे.
जून 2021 मध्ये देशात मारुती सुझुकीच्या व्हॅगन आरच्या 19,44 युनिट्सची विक्री करण्यात आली. जून महिन्याच्या तुलनेत गेल्या महिन्यात व्हॅगन आरच्या विक्रीत 179 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, व्हॅगन आरने मारुतीची बेस्ट सेलिंग कार स्विफ्टलाही मागे टाकल आहे. गेल्या महिन्यात स्विफ्टने 17,727 युनिट्सची विक्री केली.
मारुती सुझुकीने जून महिन्यात एकूण 147,388 युनिट्सची विक्री केली आहे. मे महिन्यात कंपनीने 57,228 युनिट्सची विक्री केली होती. गेल्या महिन्यात सर्वाधिक विक्री झालेल्या दहा गाड्यांच्या यादीत आठ गाड्या मारुतीच्याच आहे. याव्यतिरिक्त हुंडाई क्रेटा आणि ग्रँड आय10 Nios या गाड्यांचाही या यादीत समावेश आहे.
मारुती सुझुकीला नंबर एक वरुन हुंडाई क्रेटाने हटवले होते. मारुती सुझुकी ऑल्टो, मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर, मारुती सुझुकी स्विफ्ट, मारुती सुझुकी वॅगनर यांसारख्या सर्वाधिक विकण्यात येणाऱ्या गाड्यांना क्रेटाने मागे टाकले होते. अशातच आता मारुती सुझुकीने पुन्हा एकदा वापसी करत नंबर एकचा किताब पटकावला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.