कोल्हापुरातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार दिल्लीतील केंद्रीय पथक
कोल्हापूर: महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग हा नियंत्रणात येतोय तर, अशा परिस्थितीत राज्यातील काही जिल्ह्यातला कोरोनाचा कहर कमी होताना दिसत नाहीये. कोल्हापूर सोबतच सातारा आणि सांगली या जिल्ह्यांतही कोरोनाचा प्रादुर्भाव पहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा सुद्धा जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हा कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत नसल्याने केंद्रसरकारची सुद्धा आता चिंता वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात केंद्रीय पथक दाखल झाले आहे.
दिल्लीहून आलेलं केंद्रीय पथक आता कोल्हापूर शहरातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या दरम्यान दररोज किती टेस्टिंग होते, आरोग्य व्यवस्थेची स्थिती, ऑक्सिजनचा पुरवठा, बेड्सची स्थिती या संदर्भात केंद्रीय पथक माहिती घेणार आहे. तसेच कोविड सेंटरलाही भेट देणार असल्याची माहिती समोर येत आहे.केंद्रीय पथक दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर शहरातील सीपीआर रुग्णालयाला भेट देणार असल्याची माहिती आहे. तेथील परिस्थिती आणि सुविधांचा आढावा यावेळी घेतला जाणार आहे. यासोबतच लसीकरण कशा पद्धतीने सुरू आहे याची माहिती घेतली जाणार आहे. याबरोबरच या केंद्रीय पथकाकडून कोल्हापुरातल्या कोविड सेंटरची देखील पाहणी करण्यात येणार आहे.
कोल्हापुरातील कोरोनाची स्थिती -
(१४जुलैची माहिती)
टेस्ट - १९,१३६
नवीन बाधितांची संख्या - १६९६
डिस्चार्ज - १६३२
मृत्यू - १८
जिल्ह्यात एकूण सद्यस्थित रुग्ण - १२८१०
रुग्ण बरे होण्याचा दर - ९०.०८ टक्के
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.