Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

केवळ 50 हजार गुंतवून सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला 1 कोटींची होईल कमाई

 केवळ 50 हजार गुंतवून सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला 1 कोटींची होईल कमाई



नवी दिल्ली, 11 जुलै: कोणताही व्यवसाय करण्यासाठी तुमची आयडिया  किंवा व्यवसायामागची संकल्पनाच तुम्हाला यशस्वी उद्योजक  बनण्यात मदत करते. तुम्हालाही घरी बसून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा  असेल तर, आज आम्ही तुम्हाला एका भन्नाट व्यवसायाची माहिती देणार आहोत. या व्यवसायात तुम्ही केवळ 50 हजार रुपये गुंतवून महिन्याला कोट्यवधींची कमाई करू शकता. हा व्यवसाय म्हणजे 'ऑनलाइन होर्डिंग्ज'. आजच्या डिजिटल युगात, ऑनलाईन होर्डिंग्जचा व्यवसाय अनेकांसाठी फायदेशीर ठरत आहे.

या व्यवसायाची माहिती जाणून घेण्यासाठी न्यूज 18 ने गो होर्डिंग्स डॉट कॉम या आउटडोअर अॅडव्हर्टायझिंग स्टार्टअप कंपनीच्या संस्थापक दीप्ती अवस्थी शर्मा यांच्याशी संवाद साधला आहे. या व्यवसायातून दीप्ती दरमहा 1 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळवत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात ऑनलाइन होर्डिंगचा व्यवसाय कसा सुरू करू करायचा? आणि यातून कसे पैसे कमवायचे?

एका वर्षात एक कोटी रुपये कमवले

दीप्ती अवस्थी शर्मा यांनी सन 2016 मध्ये ऑनलाइन होर्डिंग्जचा व्यवसाय सुरू केला होता. त्यावेळी त्या अवघ्या 27 वर्षांच्या होत्या. त्यावेळी जास्त पैसे नसल्यानं दीप्ती यांनी केवळ 50 हजार रुपयांची गुंतवणूक करून ऑनलाइन होर्डिंगचं काम सुरू केलं होतं. पुढच्या वर्षी दीप्ती यांच्या कंपनीनं 12 कोटींची कमाई केली होती. एका वर्षानंतर दीप्ती यांच्या कंपनीची उलाढाल 20 कोटींच्या वर गेली.

कसा सुरू करायचा हा व्यवसाय?

खरंतर, हे काम मार्केटींग आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं सुरू केले जाऊ शकते. यासाठी, आपल्याला आकर्षक डोमेन नावासह एक वेबसाइट तयार करावी लागेल. या वेब साइटला स्वतःच प्रमोट करावं लागेल. सुरुवातीला लोकं जाहिरातीसाठी कुठे स्थान शोधत आहेत, याचं संशोधन करा. त्यासाठी लोकांशी प्रत्यक्ष संपर्क साधू शकता. मागील काही काळात हा व्यवसाय वेगानं वाढत आहे. कारण लोकं घरात बसून जाहीरात करण्याला पसंती देत आहेत.

जाणून घ्या कंपनीची कार्यपद्धती...

सर्व प्रथम, ग्राहकांना गो होर्डिंग्ज डॉट कॉमच्या वेबसाइटवर लॉग इन करावं लागेल. यानंतर, वेबसाइटवर जाऊन आपल्याला ज्याठिकाणी होर्डिंग्ज लावायचं आहे, ते स्थान निवडावं लागेल. स्थान निवडल्यानंतर, कंपनीला एक मेल जातो. त्यानंतर कंपनी वेबसाइटच्या माध्यमातून संबंधित स्थान उपलब्ध आहे का? याची पुष्टी करून ग्राहकांना माहिती देते. यानंतर ग्राहकांकडून आर्टवर्क आणि ऑर्डर घेतली जाते. संबंधित ठिकाणी लाइव्ह प्रक्षेपण करण्यासाठी वेबसाइटकडून एक आयडी आणि पासवर्ड दिला जातो. अशा पद्धतीनं हॉर्डिंग्ज लावण्यासाठी कंपनीकडून महिन्याला एक लाख रुपये शुल्क आकारले जाते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.