टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची विजयी
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने विजयी सलामी दिली. दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव जोडीने आगेकूच केली आहे. सौरभ चौधरी पात्रता फेरीत दमदार प्रदर्शन करत आहे.
भारताच्या पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक मोहिमेची सुरुवात विजयाने केली.
भारताने न्यूझीलंडवर 3-2 असा विजय मिळवला. भारतातर्फे रुपिंदर पाल सिंहने एक तर हरमनप्रीत सिंहने दोन गोल केले.
ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने एक काळ गाजवला. पुरुष हॉकी संघाच्या नावावर तब्बल आठ सुवर्णपदकं आहेत. मात्र 1980 नंतर हॉकी संघाचं सुवर्णपदकाशी असलेलं नातं दुरावलं.
नेमबाजी
सौरभ चौधरी आणि अभिषेक वर्मा हे दोघं 10मीटर एअर पिस्तूल प्रकारात पात्रता फेरीत खेळत आहेत.
टेनिस
सुमीत नागल उझबेकिस्तानच्या डेनिस इस्टोमिनविरुद्ध खेळत आहे. सुमीतने पहिला सेट जिंकला आहे.
बॅडमिंटन
सात्विकसैराज-चिराग शेट्टी यांच्यासह बी.साईप्रणीत ऑलिम्पिक मोहिमेची काही वेळात सुरुवात करतील.
चीनने कमावलं स्पर्धेतलं पहिलं सुवर्ण
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतलं पहिलंवहिलं सुवर्णपदक चीनच्या नेमबाजाने पटकावलं. चीनच्या यांग क्विआनने 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.
रोइंगमध्ये रिपिचेजवर आशा
लाइटवेट डबल स्कल प्रकारात अरविंद सिंह आणि अर्जुन जाट लाल या जोडीला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. ही जोडी रिपिचेजसाठी पात्र ठरली आहे.
तिरंदाजी: दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधवची आगेकूच
दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव ही जोडी उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. दीपिका-प्रवीण जोडीने चायनीज तैपेई जोडीवर 5-3 असा विजय मिळवला.
नेमबाजी: एलाव्हेनिल व्हलावरिनच्या हाती निराशा
महिलांच्या 10मीटर एअर रायफल प्रकारात एलाव्हेनिल व्हालवरिनला अंतिम फेरीसाठी पात्र होता आलं नाही. पात्रता फेरीत तिला 626.5 गुणांची कमाई केली.
टेटे: मनिका-शरथ पराभूत
टेबल टेनिसमध्ये मिश्र प्रकारात चायनीज तैपेईच्या जोडीने शरथ कमाल आणि मनिका बात्रा जोडीवर 11-8, 11-6, 11-5, 11-4 असा विजय मिळवला.
ज्युडो
एलिमिनेशन राऊंडमध्ये भारताच्या सुशीला देवीला पराभवाला सामोरं जावं लागलं. हंगेरीच्या इव्हा सेरनोव्हिझकीने सुशीलाला नमवलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.