Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरजेत महाराणा प्रताप चौक येथे आज आम आदमी पार्टीने वाढत्या गॅस सिलेंडर बाबत विरोध दर्शविण्यासाठी आक्रोश आंदोलन केले.

मिरजेत महाराणा प्रताप चौक येथे आज आम आदमी पार्टीने वाढत्या गॅस सिलेंडर बाबत विरोध दर्शविण्यासाठी आक्रोश आंदोलन केले.



वाढत्या पेट्रोल डिझेल भावाबरोबरच घरगुती गॅस सिलेंडरचे दर तब्बल 825 रुपये झाले आहेत. महामारीच्या व महागाईच्या काळात सर्वसामान्य जनतेवर हा मोठा आघात झाला आहे. ज्या मुद्द्यावर केंद्र सरकार सत्तेवर आले व आपल्या फसव्या जाहीरनाम्यात महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले त्यास आता केंद्र सरकारने सपशेल पाठ फिरविली असून हे सरकार म्हणजे केवळ मोठ्या व्यापाऱ्यांसाठीच अच्छे दिन दाखवीत आहे. या जुलमी सरकाराला जाब विचारण्यासाठी आम आदमीच रस्त्यावर उतरून प्रतिकार करेल असे परखड मत आम आदमी पार्टी, सांगली जिल्हा युथ विंग अध्यक्ष श्री. सागर भोसले यांनी आजच्या आक्रोश आंदोलना विषयी बोलताना मांडले. मिरज तालुका अध्यक्ष श्री. अरिफ मुल्ला, उपाध्यक्ष श्री. फय्याज सय्यद, सचिव श्री. विनोद मोरे तसेच मिरज शहर अध्यक्ष श्री. जोहेब मुल्ला, उपाध्यक्ष श्री. रवी बनसोडे, संघटन मंत्री श्रीकांत चंदनवाले, सह सचिव संदीप कांबळे, संभाजी मोरे, सांगली जिल्हा युथ विंग उपाध्यक्ष श्री. तौफिक हवालदार, सचिव श्री. निसार मुल्ला व मिरज शहर महिला संघटन मंत्री श्रीमती मनीषा माने व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. आजच्या या आंदोलनासाठी आम आदमी पार्टीच्या महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या. आपला विश्वासू


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.