केवळ 2 शर्ट वापरून नसीरुद्दीन शाहंनी पूर्ण केलं होतं चित्रपटाचं चित्रीकरण
मुंबई : बॉलिवूड अभिनेता नसीरुद्दीन शाह भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट प्रतिभा आहेत. गेल्या 5 दशकांपासून त्यांनी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. नसीरुद्दीन शाह यांचा जन्म 20 जुलै 1950 रोजी यू.पी. मधील बाराबंकी जिल्ह्यात झाला. आज त्यांचा वाढदिवस आहे. नसीरुद्दीन शाह यांनी 1975 च्या 'निशांत' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अभिनेत्याने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रत्येकाची बोलती बंद केली होती. आज आपण त्याच्या ‘कथा’ या चित्रपटाविषयी बोलणार आहोत.
या चित्रपटात सगळ्यांनीच नसीरुद्दीन शाहंचा सहज सोपा अभिनय पहिला होता. या चित्रपटात त्यांच्यासोबत फारूक शेख आणि दीप्ती नवल देखील होते. असे म्हणतात की, या चित्रपटात जिथे चित्रपटाच्या संपूर्ण कास्टला एकाहून एक सुंदर कपडे घालायला दिले गेले होते. परंतु, संपूर्ण चित्रपटात नसीरुद्दीन शाहंच्या व्यक्तिरेखेला केवळ 2 पांढरे शर्ट देण्यात आले होते. ते परिधान करून त्यांनी संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण केले.
चाळीत राहणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य
नसीरुद्दीन शाह यांचा ‘कथा’ हा चित्रपट 1983 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील नसीरुद्दीन आणि फारुख शेख यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. हा चित्रपट मुंबईत राहणार्या ‘राजाराम जोशी’ (नसरुद्दीन शाह) याची कथा होती. या चित्रपटात तो मुंबईतील चाळीत राहणारा व्यक्ती होता. या चित्रपटात वासुदेव (फारुख शेख) यांच्या एन्ट्रीचा सीनही आश्चर्यकारक आहे. ज्यात चाळीत राहणाऱ्या लोकांचे जीवन जवळून दाखवले गेले आहे.
या चित्रपटात स्वत: नसीरुद्दीन शाह यांनी म्हटले आहे की, त्यांनी या संपूर्ण चित्रपटात फक्त 2 शर्ट घातले आहेत. या चित्रपटात ते एका साध्या माणसाची भूमिका साकारत आहे. दुसरीकडे या चित्रपटात फारूक शेख बहिऱ्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. जिथे तो नसीरुद्दीन शाहची गर्लफ्रेंड संध्या (दीप्ती नवल) यांना सापळा रचून तिच्याशी लग्न न करता पळून जातो.
नसीरुद्दीन शाह यांचे काही चित्रपट खूप खास आहेत. नसीरुद्दीन शाहंच्या अभिनयामध्ये जादू आहे. ते इतरांपेक्षा खूप भिन्न आहेत. त्यांची विचार करण्याची पद्धत देखील पूर्णपणे भिन्न आहे.
धर्मावर विश्वास नसणारे नसीरुद्दीन शाह
नसीरुद्दीन शाह यांनी शबाना आझमी यांच्यासोबत 'पार' या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह यांनी डुकरांच्या एक कळपासोबत सीन केला होता. मुस्लिम धर्मात डुकरांना 'हराम' समजले जाते. नसीरुद्दीन शाहचा ‘पार’ हा चित्रपट 1984 मध्ये प्रदर्शित झाला होता. हे पात्र साकारताना त्यांनी म्हटले होते की, एखाद्या कलाकाराला कोणताही धर्म नसतो.
नसीरुद्दीन शाहचा नवा लूक
नसीरुद्दीन शाह अजूनही चित्रपटांमध्ये काम करतात. ते सतत काही नवीन मुलांच्या शॉर्ट फिल्ममध्येही काम करतात. नवीन मुलांच्या चित्रपटांमध्ये काम करताना अभिनेते कधीही पैशाबद्दल बोलत नाहीत. फारच थोड्या लोकांना माहिती आहे की नसीरुद्दीन शाह यांना मोबाईल आवडत नाही. ज्यामुळे तो लोक किंवा नवीन संचालकांशी फक्त ई-मेलद्वारे बोलतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.