Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

12 जुलैपासून मिळेल स्वस्त सोनं, सरकार देईल खरेदीची संधी, जाणून घ्या सविस्तर

 12 जुलैपासून मिळेल स्वस्त सोनं, सरकार देईल खरेदीची संधी, जाणून घ्या सविस्तर


नवी दिल्ली : जर तुम्हाला स्वस्तात सोनं खरेदी  करायचे असेल किंवा सोन्यात गुंतवणूक करण्याची इच्छा तर तुमच्यासाठी सोमवारी एक शानदार संधी मिळणार आहे. सोमवारपासून म्हणजेच 12 जुलैपासून सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम 2021-22 ची चौथी सीरिज  सुरू होत आहे. ही विक्री 16 जुलैपर्यंत होणार आहे.

रिझर्व्ह बँकेने  जारी केलेल्या या सीरिजमधील सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 4,807 रुपये निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, सरकारच्यावतीने आरबीआय सॉव्हरेन गोल्ड बाँड  जारी करते. अशावेळी तुम्ही जर गुंतवणूक करणार असाल तर जाणून घ्या सविस्तर माहिती....

ऑनलाइन खरेदीवर मिळेल विशेष सूट

सॉव्हरेन गोल्ड बाँड 2021-22 चा चौथा हप्ता सोमवारपासून पाच दिवसांसाठी सब्सक्रिप्शनसाठी सुरू होणार आहे. आरबीआयच्या मते, सॉव्हरेन गोल्ड बाँडसाठी जर तुम्ही ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केल्यास गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देखील मिळेल. अर्थात ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांना सॉव्हरेन गोल्ड बाँड 4,757 रुपये प्रति ग्रॅमने खरेदी करता येतील.

कुठे खरेदी करता येतील सॉव्हरेन गोल्ड बाँड?

तुम्ही गोल्ड बाँडची खरेदी ऑनलाइन करू शकता. याशिवाय याची विक्री बँक, सर्व कमर्शिअल बँका (आरआरबी, लघू वित्त बँक व्यतिरिक्त), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून होते. यातील कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही बाँड योजनेमध्ये सामील होऊ शकता. स्मॉल फायनान्स बँका आणि पेमेंट बँकांमध्ये यांची विक्री केली जात नाही.

किती करता येईल गुंतवणूक?

सरकारकडून आरबीआयच्या  माध्यमातून हे सॉव्हरेन गोल्ड बाँड  जारी केले जातात. या स्कीममध्ये एका आर्थिक वर्षात एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 4 किलो तर कमीत कमी 1 ग्रॅम गोल्ड बाँडची खरेदी करू शकते. शिवाय ट्रस्ट किंवा यासारख्या संस्था जास्तीत जास्त 20 किलो बाँडची खरेदी करू शकतात. याकरता जारी होणारे अर्ज 1 ग्रम किंवा त्याच्या पटीमध्ये असतात. आरबीआयने अशी माहिती दिली आहे की, भारत बुलियन अँड असोसिएशन लिमिटेडकडून गोल्ड बाँड जारी करण्याच्या आधीच्या आठवड्यातील शेवटच्या 3 व्यवहाराच्या दिवसात 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीच्या आधारे या बाँडच्या किंमती ठरतात.

सॉव्हरेन गोल्ड बाँड म्हणजे काय?

सॉव्हरेन गोल्ड बाँड एक सरकारी बाँड असतो. ज्याला डिमॅट स्वरुपात परिवर्तित करता येते. याचे मुल्य रुपये किंवा डॉलरमध्ये असत नाही तर सोन्याच्या वजनात असते. जर बाँड पाच ग्रॅम सोन्याचा आहे तर पाच ग्रॅम सोन्याची जितकी किंमत असेल तेवढी किंमत या बाँडची असेल. सरकारकडून आरबीआयच्या माध्यमातून हे सॉव्हरेन गोल्ड बाँड जारी केले जातात. सरकारने सॉव्हरेन गोल्ड बाँडची सुरुवात नोव्हेंबर 2015 मध्ये केली होती.

सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक का आहे फायदेशीर?

* मॅच्युरिटीवर सॉव्हरेन गोल्ड बाँड टॅक्स फ्री होतात.

* फिजिकल गोल्ड ऐवजी गोल्ड बाँड सांभाळणं अधिक सोपं आणि सुरक्षित.

* यामध्ये शुद्धतेची समस्या येत नाही आणि किंमती सर्वात शुद्ध सोन्याच्या आधारे निश्चित केल्या जातात.

* एक्झिटचा पर्यायही सोपा आहे. गोल्ड बाँडच्या आधारे कर्जाची सुविधा मिळते.

* याचा मॅच्यूरिटी पीरिएड 8 वर्षांचा असतो. तसेच, 5 वर्षांनंतर विक्री करण्यासाठी पर्याय मिळतो.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.