आज खरेदी करता येईल 7921 रुपयांनी स्वस्त सोनं, इथे तपासा लेटेस्ट भाव
नवी दिल्ली: 15 जुलै: सोन्याच्या किंमतीमध्ये आज घसरण पाहायला मिळाली आहे. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात 0.05 टक्के घसरण झाली आहे. ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर 48270 रुपये प्रति तोळा आहेत. आजचा सर्वोच्च दर 48298 रुपये आहे तर निचांकी दर 48254 रुपये प्रति तोळा आहे. याशिवाय चांदीच्या दरात आज तेजी पाहायला मिळाली. आज चांदीचे दर 0.12 टक्क्यांनी अर्थात 86 रुपयांनी वधारले आहेत. ज्यामुळे चांदीचे दर 69498 रुपये प्रति किलोच्या स्तरावर आहेत.
2020 बाबत बोलायचे झाले तर गेल्यावर्षी सोन्याचे दर सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर एमसीएक्सवर 56191 रुपये प्रति तोळा होते. आज सोन्याची वायदे किंमत 48270 रुपये प्रति तोळा आहे. अर्थात आज सोनं 7921 रुपये प्रति तोळाने स्वस्त मिळत आहे.
RBI ने रद्द केला राज्यातील या बँकेचा परवाना, ग्राहकांना काढता येणार नाहीत पैसे
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,824.81 डॉलर प्रति औंस आहेत. तर चांदीचे दर 0.3 टक्क्यांनी कमी होऊन 26.16 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. तर प्लॅटिनमचे दर 0.5 टक्क्यांनी कमी होऊन 1,123.83 डॉलरवर पोहोचले आहेत.
उद्यापर्यंत आहे स्वस्त सोनेखरेदीची संधी
तुम्ही जर सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी स्वस्त मार्ग शोधत असाल, तर सरकारची सॉव्हरेन होल्ड बाँड स्कीम तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. 12 जुलैपासून सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम 2021-22 ची चौथी सीरिज सब्सक्रिप्शनसाठी खुली झाली आहे.
या कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव DA, वाचा या निर्णयासंदर्भात 10 महत्त्वाचे मुद्दे
या अंतर्गत स्वस्त सोन्याची विक्री होईल. ही विक्री 16 जुलैपर्यंत होणार आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या या सीरिजमधील सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 4,807 रुपये निश्चित करण्यात आली आहे. सरकारच्या वतीने आरबीआय सॉव्हरेन गोल्ड बाँड जारी करतं. तुम्ही जर गुंतवणूक करणार असाल तर जाणून घ्या सविस्तर माहिती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.