Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'मोदी सरकार ८४ वर्षीय फादर स्टॅन स्वामींना घाबरले'

 'मोदी सरकार ८४ वर्षीय फादर स्टॅन स्वामींना घाबरले'


नवी दिल्ली - फादर स्टॅन स्वामी यांचा मृत्यू ही संस्थात्मक हत्याच असल्याची भावना एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींचे कुटुंबीय आणि त्यांच्या मित्र परिवाराने केला आहे. स्वामी हे 84 वर्षीय ख्रिस्ती धर्मगुरू आणि आदिवासी हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते होते. त्यांना आठ ऑक्‍टोबर 2020 रोजी अटक करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची प्रकृती ढासळल्याने उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांची प्राणज्योत ५ जुलै २०२१ ला मालवली. स्वामी यांच्या मृत्यूचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या निमित्तानं केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

अखेर फादर स्टॅन स्वामी हा 84 वर्षांचा म्हातारा पोलीस कोठडीतच मरण पावला. फाशीवर जाणाऱ्यांनाही शेवटची इच्छा विचारली जाते. फादरला तो अधिकारही मिळाला नाही. देश उलथवून टाकण्याच्या कटात म्हणे हा म्हातारा सामील होता. कोणता देश? कोणाचा देश? सत्य तरी काय आहे?

'मुस्कटदाबी' करणाऱया जागतिक नेत्यांच्या यादीत आपले पंतप्रधान मोदी यांचे नाव चमकले आहे. जगातील काही देशांत हुकूमशाहीसदृश परिस्थिती आहे. त्या देशांत प्रसारमाध्यमांचा गळा आवळला जातो. अशा 'मुस्कटदाबी' करणाऱया देशांच्या यादीत भारताच्या पंतप्रधानांचे नाव यावे हे आश्चर्यच आहे.

भारतात स्वातंत्र्याच्या बाबतीत परिस्थिती तितकीशी हाताबाहेर गेलेली नाही. सरकारविरुद्ध बोलणाऱयांना देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकले जाते. त्यात काही पत्रकारांचाही समावेश आहे हे खरेच आहे. तरीही भारतीय पत्रकार आपला आवाज व गळा दाबणाऱयांशी दोन हात करताना दिसतात.

मुस्कटदाबी करणाऱया जागतिक नेत्यांच्या यादीत नरेंद्र मोदी यांचे नाव प्रसिद्ध होत असताना मुंबईत फादर स्टॅन स्वामी यांचा तडफडून आणि गुदमरून मृत्यू झाला. स्वामी हे राष्ट्रीय तपास एजन्सीच्या 'कस्टडी'त बऱयाच काळापासून होते. त्यांचे वय 84 वर्षे. त्यांना ऐकता, बोलता येत नव्हते. दिसतही नव्हते. त्यांच्या हालचाली व श्वास पूर्ण मंदावला असताना तुरुंगातच त्यांना कोरोनाने ग्रासले. जीवनाच्या अंतिम समयी त्यांना झारखंड येथे जाऊन मित्रांसमवेत वेळ घालवायचा होता. पण स्वामी यांच्यावर दहशतवाद, फुटीरतावाद, राज्य उलथवून लावण्याच्या कटात सहभागी होण्याचा आरोप होता. 84 वर्षांचा एक गलितगात्र राजशकट उलथवून टाकू शकतो इतका हा देश भुसभुशीत पायावर उभा आहे काय?



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.