तत्पर सेवेसाठी शासकीय कार्यालयांच्या बळकटीकरण व सुसज्जतेवर भर देणे आवश्यक -जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली, दि. 5: संपुर्ण क्षमतेने काम करण्यासाठी कार्यालयीन वातावरण ही उत्साहवर्धक असणे आवश्यक आहे. तत्पर सेवेसाठी शासकीय कार्यालयांच्या बळकटीकरण व सुसज्जतेवर आवश्यक भर देण्यात येईल. विविध शासकीय कार्यालयांनी त्यांना आवश्यक असणाऱ्या समग्रीच्या मागणीचे प्रस्ताव विहित पध्दतीने सादर करावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
सांगलीचे तृत्तीय विशेष लेखापरिक्षक वर्ग 1, सहकारी संस्था (साखर) बाळासाहेब यादव यांच्या कार्यालयातील नवीन केबिन्स व फर्निचर कामाचा उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सुसज्ज कार्यालयातून अधिक गतीमान कामकाज व्हावे, तत्पर सेवा दिली जावी अशी भावना व्यक्त केली. या प्रसंगी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम संतोष रोकडे, कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) डॉ. एस. एन. जाधव, तृत्तीय विशेष लेखापरिक्षक वर्ग 1, सहकारी संस्था (साखर) बाळासाहेब यादव, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था निलकंठ करे, जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग 1 सहकारी संस्था किरणसिंह पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी जमिर करीम, द्वितीय विशेष लेखापरिक्षक वर्ग – 1 श्रीधर कोल्हापुरे, विशेष लेखापरिक्षक वर्ग – 1 सहकारी (सुतगिरणी) डी. पी. देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यालयातील प्रमुख केबिन, कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था यासाठी जिल्हा नियोजन समितीतून 6 लाख 55 हजारांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून करण्यात आलेल्या कामांचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते झाले. तृत्तीय विशेष लेखापरिक्षक वर्ग 1, सहकारी संस्था (साखर) या कार्यालयामार्फत सहकारी साखर कारखान्यांचे वार्षिक लेखापरिक्षण, आवसायानातील साखर कारखान्यांचे लेखापरिक्षण करण्यात येते. साखर आयुक्तालय आणि प्रादेशिक सहसंचालक साखर यांचे कार्यालये आणि कार्यक्षेत्रातील साखर कारखाने यांच्यामधील समन्वयक म्हणून हे कार्यालय काम पाहते. साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक व पुरवठादार शेतकऱ्यांकडून गाळपासाठी पुरविलेल्या ऊसाची एफआरपी अदा झाली किंवा कसे याबाबतची तपासणी या कार्यालयाकडून होते. साखर कारखान्यांना शासनाकडून प्राप्त शासकीय भाग भांडवल, शासकीय कर्ज, शासकीय हमी इत्यादी अर्थसाहय्याची परतफेड निर्धारित करुन दिलेल्या हप्त्याप्रमाणे होते किंवा नाही याबाबतचा पाठपुरावा या कार्यालयाकडून केला जातो. सहकारी क्षेत्राबाबत अत्यंत महत्वाच्या बाबींशी निगडीत सदरचे कार्यालय असल्यामुळे सुसज्ज असलेल्या या कार्यालयाकडून अधिक गतीमानतेने काम होईल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त व्यक्त केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.