Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इंधन दरवाढ व महागाई विरोधात युवक काँग्रेसची स्वाक्षरी अभियान

इंधन दरवाढ व महागाई विरोधात युवक काँग्रेसची स्वाक्षरी अभियान



केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचे दर वाढवल्याने सांगली शहर व जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने सांगली शहरातील पेट्रोल पंपावर इंधन दरवाढ व महागाई विरोधात नागरिकांच्या सह्या घेऊन स्वाक्षरी अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी नागरिकांनी ही या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी सांगली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक मंगेश चव्हाण म्हणाले, मोदी सरकार हे सर्वसामान्य जनतेचे नसून मोठ मोठे उद्योगपतींचे सरकार आहे. कोरोना काळात या देशातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी वारंवार पेट्रोल डिझेल व जीवनावश्यक वस्तूंचे दरवाढ करत आहे. जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी या देशातील जनतेची दिशाभूल करत आहे. मोदी सरकारने लवकरात लवकर जनतेला परवडतील असे दर जाहीर करावे अन्यथा युवक काँग्रेस देशातील जनतेसाठी तिव्र आंदोलन करेल. सांगली शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुहेल बलबंड म्हणाले, कोरोनाचे संकट अजून ही आपल्या देशावर कायम आहे लॉकडाऊन मुळे या देशातील सर्वसामान्य जनतेने आपले रोजगार गमावले आहे अशा गंभीर परिस्थितीत मोदी सरकार ने इंधनाचे व घरगुती गॅसचे विक्रमी दरवाढ करून या देशातील जनतेची मस्करी केली आहे.

याआधी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून महागाई वाढवणाऱ्या मोदी व त्यांच्या सरकारच्या विरोधात आंदोलने केले आहेत. आज ही पेट्रोल, डिझेलच्या दरवाढी विरोधात सर्वसामान्य जनतेच्या स्वाक्षऱ्या घेऊन केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करत आहोत. या अभियानास नागरिकांचा ही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी आमदार मोहनराव कदम, सांगली शहर-जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवा नेते विशाल पाटील, डॉ. जितेश कदम, सांगली जिल्हा युवक काँग्रेसचे प्रभारी जयदीप शिंदे, तौफीक मुल्लाणी, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सौरभ पाटील, संभाजी पाटील, उत्कर्ष खाडे, सनी धोत्रे, योगेश राणे, आशिष चौधरी, आयुब निशानदार, समीर मुजावर, स्वप्नील मिरजे, सागर काळे, अलंकार जाधव, महंमद शेख, शैलेश शेजाळ, तौफीक शिकलगार, गौरव गायकवाड, सिद्धार्थ सुर्यवंशी, जोएल जाधव, प्रशांत आहिवळे, ओंकार कांबळे आदी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.