बिग बॉस: यंदा सलमान ऐवजी 'ही' व्यक्ती दिसणार होस्टच्या रुपात
मुंबई - सलमान खानचा पॉप्युलर रियॅलिटी शो 'बिग बॉस'चा नवा सीजन लवकरच सुरू होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळीही चाहते या शोसाठी खूप उत्साहित आहे.
तर दुसरीकडे शोबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. यावेळी कार्यक्रमात मोठा बदल दिसून येणार आहे. गेली काही वर्षे बिग बॉसच सूत्रसंचालन करणारा अभिनेता सलमान खान नाही तर यावेळी बॉलिवूडचा प्रसिध्द दिग्दर्शक, निर्माता 'करण जोहर' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे.
नुकतंच ईदच्या मुहूर्तावर 'बिग बॉस - 15'चा कार्यक्रमाचा ऑफिशल प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. दरम्यान, यंदा हा कार्यक्रम डिजिटल स्पेस वर सुद्धा दाखवण्यात येणार आहे. डिजिटल स्पेस वर करण जोहर दिसणार असून टीव्ही वर सलमान खानच दिसणार आहे. या सिझन साठी अनेकांची नावं चर्चेत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.