अर्जेंटिनाला 15 व्यांदा कोपा अमेरिके स्पर्धेचे जेतेपद
रियो दि जानेरियो (ब्राझील) - दक्षिण अमेरिकेतील फुटबॉलमध्ये दबदबा राखणाऱ्या अर्जेंटिनाने 15 व्यांदा कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले. पूर्वार्धात अनुभवी एंजल डी मारियाने नोंदवलेल्या एकमात्र गोलच्या जोरावर त्यांनी गतविजेत्या ब्राझीलचा 1-0 असा पराभव केला. या विजेतेपदाने अर्जेंटिनाने सर्वाधिक 15 विजेतेपदाचा विक्रम असणाऱ्या उरुग्वेच्या कामगिरीशी बरोबरी केली.अर्जेंटिनाने ब्राझीलला धूळ चारत 1-0 अशा फरकानं विजेतेपवर मोहोर उमटविली.
तब्बल 28 वर्षांनंतर कोपा अमेरिका स्पर्धेचा किताब अर्जेंटिनाने जिंकला. यापूर्वी 1193 मध्ये अर्जेंटीनाने हा किताब आपल्या नावे केला होता. या स्पर्धेचा मानकरी मेस्सी ठरला. तर अर्जेंटिनाचा गोलरक्षक मार्टिनेझ सर्वोत्कृष्ट गोलरक्षकचा बहुमान पटकाविला. शिवाय थिएगो सिल्वा सर्वोत्कृष्ट बचावपटू ठरला.
यापूर्वी 1993 साली अर्जेंटिनानं ही स्पर्धा जिंकली होती. इक्वाडोर इथं झालेल्या अंतिम सामन्यात त्यावेळी अर्जेंटिनानं मेक्सिकोचा 2-1 अशा फरकाने पराभव केला होता. 2015 व 2016 मध्ये अर्जेंटिनानं अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती. मात्र, चिलीकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. तब्बल 28 वर्षांपासून अर्जेंटिनाला विजयाची आस होती, यंदाच्या स्पर्धेत मिळवलेल्या विजयाने प्रतिक्षा संपली आहे.
ब्राझील आणि अर्जेंटिना यांच्यापेक्षा नेमार विरुद्ध मेस्सी असा सामना रंगणार यात शंकाच नव्हती. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटापासून मिळालेल्या यलो कार्डपासून सुरू झालेली चुरस अखेरच्या मिनिटापर्यंत कायम राहिली होती.
विजेतेपदाची ईर्षा आणि त्यासाठी काहीही करण्याची तयारी असणाऱ्या दोन्ही संघातील खेळाडूंकडून अनेकदा धसमुसळा खेळ बघायला मिळाला. पूर्ण सामन्यात 9 यलो कार्डस दाखवण्यात आली. यात अर्जेंटिनाला पाच आणि ब्राझीलला चार कार्ड मिळाली.
नेमार आणि मेस्सी या दोन्ही प्रमुख खेळाडूंना प्रतिस्पर्धी खेळाडूंनी चांगलेच जखडून ठेवले होते. नेमारने एक दोनदा मुसंडी मारून आपली चुणूक दाखवली होती. पण, मेस्सीला त्यासाठी भरपाई वेळेची वाट पहावी लागली.
त्या वेळी त्याची गोल करण्याची संधी हुकली. अंतिम सामन्यात मारियाला पू्र्ण वेळ खेळविण्याचा स्कालोनी यांचा निर्णय चांगलाच यशस्वी झाला.आपल्या अनुभवाचा फायदा त्याने 21 व्या मिनिटाला संघाला करून दिला आणि मिळालेल्या खोलवर पासवर सामन्यातील एक मात्र निर्णायक गोल केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.