Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अपेक्स हॉस्पिटल ला कोणी परवानगी दिली ते जाहीर करावे

अपेक्स हॉस्पिटल ला कोणी परवानगी दिली ते जाहीर करावे



सांगली जिल्ह्याच्या व शहराच्या इतिहासात आज पर्यंत सामाजिक प्रश्नांवर मोठ मोठी  आंदोलने विविध राजकीय पक्षांच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या, संघटनांच्या ,लोकप्रतिनिधी व समाज माध्यमे यांच्या माध्यमातून झालेली आहेत ही आंदोलने होत असताना संबंधित लोकांवर टीका-टिप्पणी राजकीय आरोप व दोषारोप झालेले आहेत यामध्ये राजकीय नेते असू दे प्रशासनाचे अधिकारी असूदे व इतर सामाजिक कार्यकर्ते असूदेत यांच्यावर हे आरोप झालेले आहेत पण हे आरोप होत असताना त्यात यावेळी संबंधित लोकांनी हे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कोणत्याही प्रकारे समाज माध्यमांवर दबाव आणण्याचा कधीही प्रयत्न केलेला नाही

आज सांगली शहरांमध्ये गाजत असलेल्या अपेक्स हॉस्पिटल प्रकरणाच्या बाबतीत देखील हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे सांगलीतील भाजप कार्यकर्त्यांनी  सामाजिक संघटनांनी व विविध समाज माध्यमांनी या विरोधात आवाज उठवला होता त्याबद्दल काही लोकांवर आरोप दाखल होऊन त्यांना तुरुंगात देखील जावे लागले पण मूळ प्रश्न   या अपेक्स हॉस्पिटलला कुणी व कोणत्या आधारे परमिशन दिली जेणेकरून ज्या रुग्णांवर मोठी आपत्ती येण्याची पाळी आली त्यासंदर्भातील मुख्य दोषी कोण याकरिता विविध समाज माध्यमे, सामाजिक कार्यकर्ते यांनी आवाज उठवला आहे. या मध्ये काही आरोप प्रत्यारोप देखील झाले. मग ते प्रशासनाचे प्रमुख म्हणून महापालिका आयुक्तांवर देखील आरोप झाले आहेत. या आरोंपा पैकी अपेक्स हॉस्पिटल ला कोणत्या कागदपत्रांच्या आधारे परवानगी दिली हा आहे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती अधिकारात ही बाब विचारली असता महापालिकेकडून फक्त एका मागणी अर्जाद्वारे अपेक्स हॉस्पिटलला  परवानगी दिली गेली आहे असे सांगितले गेले जर महापालिकेने योग्यरीत्या कागदपत्रांच्या आधारे अपेक्स हॉस्पिटल ला परवानगी दिली असेल तर  त्यांनी तशी कागदपत्रे समाज माध्यमांसमोर व जनतेसमोर ठेवायला पाहिजे होती पण असे न करता मा. आयुक्तांनी समाज माध्यमातील सर्व दैनिकांच्या व मीडिया च्या संपादकांना नोटिसा काढल्या व एक प्रकारे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. जे यापूर्वी सांगलीच्या इतिहासामध्ये कधीही घडले नव्हते. म्हणून आमची मागणी आहे की आयुक्तांनी आपण जर का दोषी नसेल तर सर्व कागदपत्रे समाज माध्यमांच्या माध्यमातून  सांगली शहराच्या जनते समोर ठेवावीत जेणेकरून त्यांच्याबद्दलचा गैर अविश्वास जनतेच्या मनातून निघून जाईल.

त्याचबरोबर अपेक्स हॉस्पिटल  प्रकरणातून जे काही समोर आले त्याचा गैरफायदा इतर काही सामाजिक कार्यकर्ते हे दुसऱ्या सेंटरच्या हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना काही कारणास्तव धमकावून खंडणी मागण्याचा प्रयत्न करत आहेत त्याची देखील चौकशी होऊन त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे.

पृथ्वीराज पवार, सतीश साखळकर,उमेश देशमुख,महेश खराडे,अमर पडळकर,आशिष कोरी,अविनाश जाधव,आसिफ बावा,डॉक्टर संजय पाटील, प्रशांत भोसले,राहुल पाटील, महेश पाटील.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.