Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ॲपेक्स केअरमधील ८७ जणांच्या मृत्यूबाबत महापलिका आयुक्त आणि सांगली जिल्हा प्रशासन विरूध्द हायकोर्टात जनहित याचिका दाखल सांगली जिल्हा संघर्ष समितीची याचिका

ॲपेक्स केअरमधील ८७ जणांच्या मृत्यूबाबत महापलिका आयुक्त आणि सांगली जिल्हा प्रशासन विरूध्द हायकोर्टात जनहित याचिका दाखल सांगली जिल्हा संघर्ष समितीची याचिका

सांगली दि. ०३: ॲपेक्स केअर हॅास्पिटलमध्ये ८७ जणांच्या मृत्यू तांडव प्रकरणी महापलिका आयुक्त नितीन कापडणीस आणि जिल्हा प्रशासन यांचे कारभाराची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करावी अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयांत जिल्हा संघर्ष समिती सांगलीचे अध्यक्ष श्री तानाजी रुईकर यांनी दाखल केली आहे. 

मिरज ही आरोग्य पंढरी म्हणून ओळखली जाते या नावलौकीकास डॅा. महेश जाधवने काळीमा फासला आहे. मिरज शहराचे नाव बदनाम केले आहे. डॅाक्टर  हा समाजामध्ये देवदूत मानला जातो परंतु महेश जाधव हा यमदूतच झाला आहे. जिवनदायी मिरज आता मृत्यदायी मिरज म्हणून ओळखले जावू लागले आहे असे वाटत आहे. त्यास ॲपेक्स  केअर हॅास्पिटलला कायदेशीर तरतूद डावलून मान्यता देणारे महापलिका आयुक्तच पुर्णत: जबाबदार आहेत.

डॅा. महेश जाधव, त्याचा भाऊ डॅा. मदन जाधव आणि त्यांना सहकार्य करणारे तथाकथित तज्ञ डॅाक्टर यांनी या हॅास्पिटलमध्ये कोणतीही सक्षम आरोग्य यंत्रणा उभी न करता फक्त एका हेंटीलेटवरव्दारे ८७ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले आहेत. महापालिका आयुक्तांनी कोणतीच शहानिशा न करता अत्यंत जलद गतीने एका पानाच्या साध्या अर्जावर डॅा. महेश जाधव या व्यक्तीस डेडिकेटेड कोविड हॅास्पिटल सुरु करण्याची परवानगी देऊन  या मृत्यूमध्ये भागीदारी केली आहे. या डॅाक्टरच्या अलिशान गाडया कायम आयुक्तांच्या सेवेसाठी हजर असायच्या याबाबतच्या सुरस कथा समाजमाध्यमातून प्रसारत आहेत. आयुक्त आणि त्यांचे अधिकारी यांचे मोबाईल फोनचे संपर्क तपासल्यास घनिष्ठ संबंधाचे फार मोठे षढयंत्र बाहेर येईल म्हणून आता कारवाई आम्हीच केली असा आव आणत खुलासा करत प्रसिध्दीपत्रक महापालिकेने काढले आहे.

या हॅास्पिचलमध्ये तीन एम.डी. डॅाक्टर असल्याचे फक्त कागदपत्रावर दाखवले होते, प्रत्यक्ष कोणताही डॅाक्टर  रुग्णावर इलाज करण्यासाठी उपलब्ध नसताना महापलिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांनी खोटा पाहणी अहवाल सादर करून महेश जाधव याचेवर मेहरनजर केली आहे. व्हेंटीलेटर आणि अन्य उपकरणे नसताना ती आहेत असे बेधडक खोटी माहिती शासनाच्या वेबसाईट दाखवली आहे. हॅास्पिटलकरीता नेमलेल्या शासन अधिकार्‍यांनेदेखिल गैरकारभाराबद्दल मौन धारण करुन महेश जाधवच्या लुटीस सहकार्यच केले आहे. 

वैद्यकिय साधन सुविधांचा अभाव, तज्ञ डॅाक्टर व नर्सिंग स्टाफ नाही म्हणून ॲपेक्स केअर हॅास्पिटल बंदचा आदेश दिला गेला. अश्या गैरसुविधा असणारे हॅास्पिटल त्वरीत बंद करून तेथे दाखल असलेले रुग्ण योग्य उपचारासाठी अन्य रुग्णालयांत हलविणे आवश्यक असताना त्यांना तिथेच उपचाराखाली ठेवून त्यांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेले महापालिका आयुक्तांच्या कारभाराची विषेश चौकशी करावी अशी मागणी या जनहित याचिकेमध्ये केली आहे.

हॅास्पिटल बंद करण्याच्या आदेशानंतही पुढे दहा-बारा दिवस नवीन रुग्ण दाखल करून घेऊन त्यांच्यावर इलाज न करता महेश जाधवने त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलेले आहे. याची संपूर्ण माहिती दररोज शासनाच्या वेबसाईटवर अद्यावत होत होती आणि ती सर्व जबाबदार अधिकार्‍यांना ज्ञात होती. तरीदेखिल जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि महापलिकेचे वैद्यकिय आरोग्य अधिकारी यांनी कोणतीच कारवाई केली नाही म्हणजेच ते सुध्दा या मृत्यू तांडवांस तेवढेच जबाबदार आहेत. हाॅस्पिटल बंद आदेशानंतरच्या दिवसांत चौदा मृत्यू झाले याची सर्वस्वी जबाबदारी महापलिका आयुक्त आणि जिल्हा प्रशासन यांची आहे.

मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळावा आणि या घटनेपाठीमागे असणारा वरदहस्त कोणाचा हे जनतेस कळावे म्हणून या सर्वाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी व्हावी अशी मागणी करणारी जनहित याचिका संघर्ष समितीच्या वतीने दाखल केली आहे. 



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.