केवळ 45 रुपयात खरेदी करा शेअर;दोनच दिवस आहे ऑफर..
नवी दिल्ली, 27 जुलै: कोरोनामुळे बरेच लोक आता पैशांच्या बचतीसोबतच गुंतवणुकीचाही विचार करू लागले आहेत. बचत कधी ना कधी संपते, मात्र गुंतवणूक वाढत जाते हे आता लोकांच्या लक्षात आलं आहे. तुम्हीही जर शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात, तर सध्या तुमच्याकडे चांगली संधी आली आहे. सरकारी कंपनीमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकता.
हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, म्हणजेच हुडको या सरकारी कंपनीमधील आपले 8 टक्के शेअर्स केंद्र सरकार विकत आहे. यात एकूण 16.01 कोटी शेअर्सची ऑफर फॉर सेलमधून विक्री करण्यात येणार आहे. मंगळवारपासून (27 जुलै) या शेअर्सची विक्री करण्यात येणार आहे. यातून सरकार सुमारे 720 कोटी रुपये उभारणार आहे.
अवघ्या 45 रुपयांना एक शेअर
रेग्युलेटरी फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हुडकोच्या एका शेअरची किंमत अवघी 45 रुपये असणार आहे. सरकार ऑफर फॉर सेल (ओएफएस) च्या माध्यमातून 2.5 टक्के किंवा 5 कोटींपेक्षा जास्त शेअर्सची सदस्यता राखण्याच्या पर्यायासह 5 टक्क्यांपेक्षा जास्त भागभांडवल किंवा 11.01 कोटी शेअर्सची विक्री करीत आहे.
केवळ उद्यापर्यंत सुरू असणार ओएफएस
गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहीन कांता पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हुडकोमधील भारत सरकारच्या इक्विटीच्या विक्रीचा प्रस्ताव आजपासून नॉन रीटेल गुंतवणूकदारांसाठी खुला केला जाईल. त्याचबरोबर उद्यापासून (28 जुलै) रिटेल गुंतवणूकदार त्यात पैसे गुंतवू शकतील. ग्रीन शू पर्याय म्हणून सरकार अतिरिक्त 2.5 समभागांसोबत 5.5 टक्के शेअर्सची विक्री करणार आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नगरविकास मंत्रालयामार्फत हुडको शेअर्सच्या विक्रीस मान्यता दिली आहे. पहिल्या दिवशी म्हणजेच 27 जुलै रोजी 11.01 कोटी शेअर्स विकले जातील, ज्यासाठी प्रति शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपये असेल. हे सरकारचे सुमारे 5.5% भागभांडवल असेल.
या पूर्वी बीएसई सेन्सेक्समध्ये हुडकोच्या शेअरची किंमत 6.22 टक्क्यांनी कोसळून 47.50 रुपयांवर तो बंद झाला होता. ओएफएससाठी याची फ्लोअर प्राईज त्याहून कमी, म्हणजेच 45 रुपये ठेवण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.