35 हजाराला एक द्राक्ष, ही आहेत जगातली सर्वात महाग फळं
काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील एक आंब्याची वाडी प्रचंड व्हायरल झाली होती. कारणही तसंच होतं. 'टमँगो' नावाच्या जापानी प्रजातीच्या आंब्यांच्या सुरक्षेसाठी इथे विविध उपाय करण्यात आले होते. या फळाची किंमत अडीच लाख इतकी होती. मात्र हे एकच फळ महाग आहे असं नाही. तर अशी अनेक फळं आहेत ज्याच्या किंमती अधिक आहेत.
जपानच्या 'रुबी रोमन' द्राक्ष हे प्रसिद्ध आहे. या द्राक्षांचा आकारही मोठा आहे. हे फळ लक्झरी फळांच्या श्रेणित मोडलं जातं. हे द्राक्ष पिंगपाँग बॉल्स इतकं मोठं असतं आणि द्राक्षाचा आकार आणि टेक्चर एक सारखं असतं. त्यासोबतच द्राक्षाची चव देखील अधिक गोड असते. जपानच्या इशिकावा प्री फ्रेक्चरलने तयार केलं होतं. आणि काही वर्षांपूर्वी या 24 जपानी द्राक्षांची लिलावात करण्यात आलेली किंमत 8 लाख 17 हजार रुपये इतकी होती. म्हणजे प्रत्येक द्राक्षाची किंमत जवळपास 35 हजार रुपये इतकी होती.
भगवान गौतम बुद्धांच्या आकारातील नासपती फळ देखील महागड्या फळांमध्ये मोडते. भगवान बुद्धांच्या आकारातील नासपती चीनमधील एक शेतकऱ्यानं विकसित केली आहे. या फळाची किंमत 700 रुपये इतकी आहे. अनेकदा तर लोक मागेल ती रक्कम देण्यासाठी देखील तयार असतात.
क्यूब आणि स्क्वॉयरमधील टरबूज हे जगातील सर्वात महागडे असे टरबूज आहेत.. जपानमध्ये हे टरबूज स्क्वॉयर वुडमध्ये उगवले जातात त्यामुळे त्यांना विशिष्ट आकार प्राप्त होतो. या आकारांमुळे आणि अप्रतिम चवीमुळे या फळाची किंमत 5 किलो क्यूब टरबुजाची किंमत जवळपास 60 हजार रुपये असेल.
सेंबिकिया स्ट्रॉबेरी ही जगातील सर्वात महागडी स्ट्रॉबेरी मानली जाते. एका फ्रूट शॉपवरून याचं नाव ठेवण्यात आलं आहे. 1834 मध्ये तयार झालेले सेंबिकिया दुकान हे सर्वात जुन्या दुकानांपैकी एक दुकान आहे. या प्रजातिची स्ट्रॉबेरी केवळ जपानमध्ये मिळत असून खूप गोड असते. 12 स्ट्रॉबेरीची किंमत 85 डॉलर्स म्हणजे 6 हजार रुपये इतकी आहे. सेकाई ईची सफरचंद हे जगाती सर्वात महाग सफरचंद म्हणून ओळखलं जातं आणि सर्वाधिक पौष्टिक म्हणून देखील त्याची गणणा होते. 1974 मध्ये ते सर्वात प्रथम बाजारात आणलं जातं. हे सफरचंद पिकवणारे शेतकरी मधामध्ये त्यांना धुतात आणि हँड पॉलिनेशनचा वापर करण्यात येतो. एका सफरचंदाची किंमत 1600 रुपये इतकी आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.