Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अँटीबॉडीजमुळे लहान मुले सुरक्षित; तिसऱ्या लाटेचा धोका कमी

अँटीबॉडीजमुळे लहान मुले सुरक्षित; तिसऱ्या लाटेचा धोका कमी


नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटना (डब्लूएचओ) आणि आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) केलेल्या सिरो सर्वेक्षणातून काहीसे दिलासादायक निष्कर्ष समोर आले आहेत. देशभरात विविध ठिकाणांवर लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याचे आढळून आले असून काही ठिकाणी हे प्रमाण ५० ते ८० टक्क्यांदरम्यान आहे. या मुलांना कोरोना संसर्ग झाल्यानेच त्यांच्यात अँटीबॉडीज तयार झाल्या असून आता तिसरी लाट आली तरी देखील त्याचा लहान मुलांना फारसा धोका असणार नाही, असा निष्कर्ष यातून काढण्यात आला आहे.

या सर्वेक्षणासाठी दहा हजार व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती. त्यातील केवळ चार हजार ५०९ नमुन्यांचे विश्‍लेषण करण्यात आले होते. दिल्ली शहर, ग्रामीण भाग म्हणजे फरिदाबाद परिसरातील गावे, भुवनेश्‍वर, आगरताळा आणि गोरखपूरचा ग्रामीण भाग या ठिकाणी हे सर्वेक्षण करण्यात आले. ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी ही माहिती दिली. प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले आहे. प्रौढ व्यक्तींमध्ये संसर्गाचे प्रमाण ५५.७ टक्के, तर लहान मुलांमध्ये हे प्रमाण ६३.५ टक्के आहे.

देशात बहुतांश भागांमध्ये लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला मात्र ते लक्षात आले नाही. बहुतांश मुलांना त्याचा त्रासही झाला नाही. ज्या मुलांना त्रास झाला त्यांना सहव्याधीचा त्रास असल्याचे ते म्हणाले. देशभर अनेक लहान मुलांना याआधीच कोरोना होऊन गेला असून त्यातून ते बरेही झाले आहेत, त्यामुळे त्यांना परत संसर्ग होण्याची शक्यता कमीच आहे, असे हे सर्वेक्षण सांगते. पुढील लाटेमध्ये लहान मुलांमध्ये कोरोनाचे गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता कमीच आहे. अँटीबॉडीजमुळे त्यांना संरक्षण मिळू शकते,ही सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.