लसीकरणानंतरही 'डेल्टा व्हेरिएंट' अतिशय घातक; 'या' वयातील लोकांना जास्त धोका
नवी दिल्ली : देशात करोनाच्या नव्या डेल्टा व्हेरिएंटने जगातील अनेक देशांच्या चिंतेत भर टाकली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोनाच्या या नव्या व्हेरिएंटला सर्वात धोकादायक असल्याच मानत व्हेरिएंट ऑफ कंसर्न यादीत टाकले आहे. करोनाचा नवा डेल्टा व्हेरिएंट हा लसीकरण झालेल्या लोकांनाही मृत्यूच्या दारात ओढत असल्याचा धक्कादायक खुलासा एका अहवालातून समोर आला आहे.
पब्लिक हेल्थ इंग्लंडनुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार , आतापर्यंत ब्रिटनमधील ११७ लोकांचा डेल्टा व्हेरिएंटमुळे मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ५० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्यांमध्ये १०९ जणांचा समावेश आहे. त्यातील ५० लोक असे आहेत ज्यांनी करोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते.
रिपोर्टप्रमाणे, ५० वर्षापेक्षा कमी वयातील लसीकरण घेणाऱ्या एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. डेल्टा व्हेरिएंटच्या जाळ्यात अडकलेल्या ५० पेक्षा कमी वय असलेल्या मृतांमध्ये ८ जणांचा समावेश आहे. त्यात लसीचा सिंगल डोस घेणाऱ्या दोघांचा समावेश आहे.
याची सरासरी आकडेवारी पाहिली तर मृत्यू दर ०.१३ इतका आहे. मात्र यामुळे कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंटवर कोविड लस प्रभावी ठरत नाही का? असा प्रश्न उभा राहतो. लसीकरण अभियानातंर्गत ब्रिटनच्या लोकांना एस्ट्राजेनेका आणि फायझर या दोन्ही लसीचे डोस दिले होते. जगभरातील अनेक देशात या लसीचा वापर होत आहे.
काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये एक डेटा जारी करण्यात आला होता. यात फायझर लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर डेल्टा व्हेरिएंटपासून ८८ टक्के बचाव होऊ शकतो आणि एस्ट्राजेनेका लस ६० टक्के बचाव करू शकते असं सांगितलं होतं. परंतु डेविड स्पाईगेहेल्टर आणि अँथोनी मास्टरसारखे तज्ज्ञ म्हणतात कोविड १९ मृत्यूमध्ये वय हाही एक मोठा आधार मानला जातो. तज्ज्ञांचा दावा आहे की, माणसाचं वय जितकं जास्त असेल तितकं संक्रमण आणि मृत्यूचा धोका जास्त वाढतो. त्यामुळे ८० वर्षावरील लस घेतलेल्या लोकांमध्ये संक्रमणाचा धोका ज्यांनी लस घेतली नाही त्यांच्या तुलनेत जास्त असू शकतो. त्यामुळे काही लोकांचा जीव जातो.
WHO ने शुक्रवारी डेल्टा व्हेरिएंटवर सतर्कता बाळगण्याचे आवाहन करत म्हटले की, ज्यांनी लसीकरण पूर्ण केले त्यांनी अधिक काळजी घेणं गरजेचे आहे. लसीचे दोन्ही डोस घेतले तरी मास्क घाला, सोशल डिस्टेंसिंगचं पालन करा. हात स्वच्छ धुवावे. ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेत ते पूर्णत: संरक्षित नाही. जरी ते लोक संक्रमित झाले, त्यांच्यात कोणतेही लक्षण नसेल तरी ते संक्रमण वाढवण्यात मदत करत राहतील असे WHO च्या डॉ. मैरिएंजेला सिमाओ यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.