Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्वातंत्र्य दिनी उघडणार शाळा? तीन टप्प्यात ऑफलाइन शाळा होणार सुरू

स्वातंत्र्य दिनी उघडणार शाळा ? तीन टप्प्यात ऑफलाइन शाळा होणार सुरू



सोलापूर : कोरोनाची (Corona) पहिली लाट आणि दुसऱ्या लाटेमुळे तब्बल 15 महिन्यांपासून शाळांना कुलूपच आहे. शाळा (School) बंद असल्याने विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची गोडी कमी होऊ लागली असून अनेकांकडे ऑनलाईनची (Online) साधनेही उपलब्ध नाहीत. या पार्श्‍वभूमीवर तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन 15 ऑगस्टपासून तीन टप्प्यात (three phases) ऑफलाइन शाळा (Offline school) सुरू करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केल्याचे विश्‍वसनिय सूत्रांनी सांगितले.

पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा मार्च 2020 पासून सुरूच झाली नाही. तर सहावी ते आठवीचे वर्ग मागच्या वर्षी काही दिवसांसाठीच सुरू झाले. त्यामुळे शाळेत नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत आल्यानंतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. शाळांमधील गर्दी पाहून मुले भेदरतील, वर्षभर मुले घरीच असल्याने त्यांच्यातील अभ्यासाची सवय मोडत आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे अनेकांना डोळ्याचा त्रास सुरू झाल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांनी नोंदविले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.