Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी आ. आसगावकरांनी शासन दरबारी कैफियत मांडावी..!!रावसाहेब पाटील.. महामंडळ खजिनदार

शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी आ.आसगावकरांनी शासन दरबारी कैफियत मांडावी..!!रावसाहेब पाटील.. महामंडळ खजिनदार

कोल्हापूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या बैठकीत महामंडळ खजिनदार रावसाहेब पाटील यांनी शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी आ. आसगावकर यांनी शासनासमोर कैफियत मांडावी असे आवाहन केले.

शैक्षणिक व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खालील मागण्या मांडण्यात आल्या.. कनिष्ठ महाविद्यालयीन संच मान्यता झाली नाही म्हणून पगार बंद करण्याचा शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांनी काढलेला आदेश मागे घ्यावा.महापूर व कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन २०१९ - २० ते २०२१-२२ या तीन वर्षाच्या संच मान्यता रद्द कराव्यात.

शिक्षण उपसंचालक व कोल्हापूर शिक्षणाधिकारी यांच्या कडे प्रलंबित शिक्षक मान्यता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधीन ठेवून अल्पसंख्याक शाळांमधील अनुदानित व विनाअनुदानित शिक्षकांच्या मान्यता त्वरित द्याव्यात. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आॅनलाईन शिक्षण.. निकालाच्या कामात शिक्षक व्यस्त आहेत. फी वसूलीस निर्बंध लादल्याने त्यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. ५०%फी वसूलीस परवानगी मिळावी.

वेतनेतर थकित अनुदान तातडीने द्यावे.अनुकंपा तत्वावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तातडीने मान्यता द्यावी. आर.टी.ई.अंतर्गत २५%प्रवेशित विद्यार्थी फी परतावा त्वरीत द्यावा. शाळा महाविद्यालयांना वीज व पाणीपट्टी घरगुती दराने आकारणी करावी. नोकर भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. शिक्षकेतर भरती बंदी उठवावी व संस्थांनी नेमलेल्या हंगामी शिक्षकेतर सेवकांच्या नियुक्त्यांना तातडीने मान्यता द्यावी व नवीन भरतीला मंजूरी द्यावी. कनिष्ठ महाविद्यालयीन विषय विभागणीचा जी. आर. रद्द करावा. टीईटी परीक्षा व वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी प्रशिक्षण तातडीने आयोजित करावे. चतुर्थश्रेणी कर्मचारी कंत्राटी ऐवजी नियमित वेतनश्रेणीवर नेमण्यास मंजूरी मिळावी. शिक्षक बाह्यमूल्यमापन निर्णय तातडीने रद्द करावा. मूल्यमापनाची प्रचलित पध्दत चालू ठेवावी. विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पगार सुरू करावेत. आरटीई अंतर्गत दर तीन वर्षांनी मान्यता घेण्याची अट काढून फक्त एका पत्राद्वारे मान्यता द्यावी. २०%व ४०% टप्पा अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तातडीने फरक द्यावा. विना दाखला ९वी व १० वी प्रवेश निर्णय तातडीने रद्द करावा. ५वी व ८ वी चे वर्ग प्राथमिकला जोडण्याचा निर्णय रद्द करावा. प्रयोगशाळा परिचर व सहाय्यक नेमणुकीस मंजूरी द्यावी. रोष्टर पडताळणी शिक्षणाधिकारी व उपसंचालक स्तरावरच व्हावी. कोविड काळात शाळा निर्जंतुकीकरणासाठी अनुदान द्यावे. शिक्षणावरील खर्चाचे बजेट वाढवा इ. मागण्या करण्यात आल्या. आ. जयंत आसगावकर यांनी संस्थांच्या, शिक्षण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबध्द असल्याचे सांगितले. यावेळी आ. आसगावकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रावसाहेब पाटील, शिवाजी माळकर, एस. डी. लाड, प्रा. एन. डी. बिरनाळे, पुंडलिक जाधव, बाबा पाटील, इनामदार, संजय यादव, भागवत, खतीब, उदय पाटील, संदीप पाटील, एम. एन. पाटील, वडेर व संस्था चालक उपस्थित होते.

प्रा. एन. डी. बिरनाळे

सहकार्यवाह, सांगली. 

सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ

८८८८४७५५५२


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.