Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

केंद्राच्या शेतकरी कायद्यांची काँग्रेसच्यावतीने सांगलीत होळी राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प दिन साजरा..

केंद्राच्या शेतकरी कायद्यांची काँग्रेसच्यावतीने सांगलीत होळी राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प दिन साजरा..

सांगली, दि. १९ :काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटी आणि किसान काँग्रेसच्या वतीने 'संकल्प दिन' साजरा करण्यात आला, तसेच केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात केलेल्या काळ्या कायद्याच्या निषेधार्थ या कायद्यांची होळी करून काँग्रेस भवनसमोर आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी शेतकरी आंदोलन आणि संकल्प दिन याविषयी सूचना केल्या होत्या, त्यानुसार शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. 'हमारा संकल्प राहुलजी को लाना है' असा संकल्प यावेळी करण्यात आला. केंद्रातील मोदी सरकारने पारित केलेल्या काळ्या शेतकरी कायद्यांचा यावेळी निषेध करण्यात आला. 'शेतकरी कायदा आणि जनतेला काय त्याचा फायदा' अशी भूमिका घेऊन हे आंदोलन झाले. यावेळी एक देश एक बाजारपेठ कायदा - २०२०, करार शेती व्यवसाय कायदा - २०२०, जीवनावश्यक वस्तू सुधारणा कायदा - २०२० हे रद्द करावेत अशी मागणी करण्यात आली. या कायद्यांची होळी करण्यात आली. 

यावेळी कार्यकर्त्यांनी 'नरेंद्र मोदी, किसान विरोधी', 'जो किसानोंसे टकरायेगा, वो मिट्टी में मिल जायेगा', 'काळा कायदा मोदींचा, शेतकऱ्यांच्या बरबादीचा', 'शेतकरी विरोधी जुलमी कायदा फक्त अदानी - अंबानी यांनाच याचा फायदा'',  'माझी मशाल माझा दणका, पेटवू मोदींच्या पापाची लंका' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. पेट्रोल, डिझेल, गॅस, गोडेतेल दरवाढविरोधात तसेच बेरोजगारीविरोधातही हे आंदोलन होते.

या आंदोलनात महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील, प्रा. नेमिनाथ बिरनाळे, अण्णासाहेब कोरे, महावीर पाटील, बिपिन कदम, नगरसेवक मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, संतोष पाटील, अभिजीत भोसले, रवींद्र वळवडे, कयूम पटवेगार, अशा पाटील, क्रांती कदम, कीर्ती देशमुख, मालन मोहिते, देशभूषण पाटील, अल्ताफ पेंढारी, आयुब निशानदार, सोहेल बलबंड, आशिष चौधरी, अजित ढोले, माणिक कोलप, आयुब पटेल, राजेंद्र कांबळे, बाबगोंडा पाटील, मौला वंटमुरे, पैगंबर शेख, याकूब मणेर, अरविंद जैनापुरे, भाऊसाहेब पवार, पवन महाजन, प्रशांत अहिवळे, अथर्व कराडकर, कुमार पाचोरे, सरदार मुल्ला, बाबालाल जाधव, रमेश जाधव, पंकज बिरनाळे, सचिन चव्हाण, कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.