कमी झालेली संख्या पुन्हा वाढली;पुण्यातील 91 गावं कोरोना हाॅटस्पाॅट म्हणुन घोषित
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रभरात हाहाकार माजवला असल्याचं गेल्या दोन महिन्यांपासुन पाहायला मिळत आहे. रूग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेेवर मोठ्या प्रमाणात ताण आला. परंतु, आता हळुहळु कोरोना आटोेक्यात येत असतानाच कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यातुन धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पुण्यातील 13 तालुक्यातील 91 गावं कोरोना हाॅटस्पाॅट म्हणुन घोषित करण्यात आले आहेत. दोन आठवड्यांपुर्वी ही संख्या 84 वर होती. पण आता ही कोरोना हाॅटस्पाॅट गावांची संख्या आता 91 वर गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पुरंदर, जुन्नर आणि खेड या तालुक्यातील सर्वाधिक गावांचा कोरोना हाॅटस्पाॅटमध्ये समावेश आहे. मागच्या 15 दिवसांपुर्वी कमी झालेल्या रूग्णसंख्येंमुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असताना आता कोरोना हाॅटस्पाॅट गावांची संख्या वाढल्याने पुन्हा चिंता वाढली आहे.
ज्या गावांमध्ये 10 पेक्षा अधिक कोरोना रूग्णांची संख्या असते अशा गावांना कोरोना हाॅटस्पाॅट म्हणुन घोषित करण्यात येत असते. शिरूर, वेल्हा, मावळ आणि हवेली या तालुक्यातील सर्वात कमी गावांचा हाॅटस्पाॅट गावांमध्ये समावेश आहे. शहरी भागात काही प्रमाणात कोरोना आटोक्यात येत असताना पाहायला मिळत असताना ग्रामिण भागात कोरोना हात पाय पसरत असताना दिसून येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.