"मी शिक्षकाचा मुलगा, मला सुसंस्कृतपणा शिकवू नये"; आम.गोपीचंद पडळकरांचं बाळासाहेब थोरातांच्या कन्येला प्रत्युत्तर
राज्यात मराठा आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचे पाहायला मिळत आहे. या दोन्ही आरक्षणाच्या मुद्द्यांवरून भाजप आक्रमक झाला असून, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईन, असं मोठं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे सांगत टोला लगावला. त्यामुळे, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी थोरातांवर टीका केली. मात्र, पडळकर यांनी वापरलेली भाषा न रुचल्याने शरयू देशमुख यांनी पडळकरांना संस्कार शिकवले. यानंतर आता पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांनी शरयू देशमुख यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
"काही घराणी अतिसुसंस्कृत आहेत. मी शिक्षकाचा मुलगा असून मला सुसंस्कृतपणा माहित आहे. तुमच्या विरोधी बोलल्यानंतर सुसंस्कृतपणा दिसून येतो, मला तो शिकवू नका," असं म्हणत पडळकर यांनी बाळासाहेब थोरत यांच्या कन्येला प्रत्युत्तर दिलं.
काय म्हणाल्या होत्या शरयू देशमुख?
"पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होत. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती. असो, ज्याचे त्याचे संस्कार..!, असे ट्वीट शरयू यांनी केलं होतं. भाजपा आमदाराने आपल्या वडिलांवर केलेली टीका न पटल्याने शरयू देशमुख यांनी ट्विटरवरुनच पडळकर यांना प्रत्युत्तर देताना संस्कार शिकवले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.