Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माव्या सुदन बनली जम्मू-काश्मीरची पहिली महिला फायटर

 माव्या सुदन बनली जम्मू-काश्मीरची पहिली महिला फायटर

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे नाव अभिमानाने पुन्हा एकदा उंचावण्याचे काम एका २३ वर्षीय तरुणीने केले आहे. २३ वर्षीय माव्या सुदन ही भारतीय हवाई दलात फायटर पायलट बनणारी जम्मू काश्मीरची पहिली महिला ठरली आहे. माव्याची फ्लाईंग ऑफिसर म्हणून हवाई दलात भरती झाली आहे.

माव्या मुळची जम्मूच्या राजौरी येथील रहिवासी आहे. माव्या देशातील महिला फायटर बनणारी १२ वी महिला आहे. शनिवारी तेलंगाना येथील हुंदिगल वायुसेना अकादमीच्या पासिंग आउट परेडमध्ये सामील झालेल्या छात्रात ती एकमेव मुलगी होती. आता तिला एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे आणि त्यानंतर ती ऑपरेशनल पायलट बनेल. जम्मूमधील कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर, माव्या पुढील शिक्षणासाठी चंदीगडला गेली. तिथून तिने राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले. माव्याने 2020 मध्ये भारतीय हवाई दलाची प्रवेश परीक्षा दिली होती.

माव्याचे वडील विनोद मुलीने मिळविलेल्या यशाने खुपच आनंदी आहेत. ते म्हणतात माव्या आता केवळ माझी मुलगी नाही तर देशाची कन्या बनली आहे. लहानपणापासून तिला भारतीय हवाई दलात फायटर पायलट बनायची इच्छा होती आणि तिचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे.तसेच आता ती माझी मुलगी नाही तर देशाची मुलगी बनली असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले.

तर जम्मूची पहिली महिला फायटर बनलेल्या माव्या म्हणाली,' ही तर सुरवात आहे. मला देशभरातून खूप प्रेम मिळत आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अजून खूप काही करायचे आहे. मला मिळालेल्या यशाने माझ्या गावकऱ्यांची छाती अभिमानाने भरून आली आहे. अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोना सिंग या भारतीय हवाई दलात फायटर पायलट बनलेल्या पहिल्या तिघी महिला आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.