Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापूरमध्ये पुन्हा 'लॉकडाऊन'

 कोल्हापूरमध्ये पुन्हा 'लॉकडाऊन'




कोल्हापूर, 27 जून: राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे अनेक जिल्ह्यात निर्बंध पुन्हा कडक करण्यात आले आहे. कोल्हापूरमध्ये सुद्धा नवीन निर्बंध लागू  करण्यात आले आहे. संध्याकाळी 4 वाजेनंतर शहरासह जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

कोल्हापूरमध्ये  निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर ठिकठिकाणी गर्दी वाढली होती. त्यामुळे कोरोना नियम पायदळी तुडवण्यात आल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. त्यामुळे शहरात पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. गेल्या सप्ताहातील कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 16 टक्क्यांवर पोहोचला. त्यामुळे शिथिल करण्यात आलेले नियम आता पुन्हा एकदा कडक करण्यात आले असून नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे. जिल्ह्याचा स्तर चौथ्या लेव्हलमध्ये पोहोचला आहे.

त्यामुळे संध्याकाळी 4 वाजेपर्यंत दुकानं सुरू राहणार आहे. गर्दी होऊ नये म्हणून सार्वजनिक कार्यक्रम, परिषदा, मेळावे घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यात नियमांचं पालन करण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकान सकाळी सात ते संध्याकाळी चार पर्यंत खुली राहणार आहे. यापूर्वीची नियमावली कोल्हापूर जिल्ह्यात कायम राहणार आहे.

अशी आहे नियमावली

- नागरिकांनी अत्यावश्यक सेवा, तातडीची वैद्यकीय गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये.

- अत्यावश्यक सेवा, किराणा दुकाने, बेकरी इत्यादी दुकाने सकाळी 7 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, नागरिकांनी दुकानात न जाता घरपोच सेवा मागवावी. अत्यावश्यक बाब नसेल तर अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडू नये.

- हॉटेल्स, रेस्टॉरंट यांनी फक्त घरपोच सेवा द्यावी.

- शेती व शेतीशी निगडीत त्याचप्रमाणे मान्सून पूर्व करावयाची सर्व कामे सुरू ठेवावीत.

- अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरू तर शनिवार रविवार पुर्णपणे बंद

- मॉल्स, सिनेमागृहं संपुर्ण बंद.

- रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत आसनक्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने आणि शनिवार-रविवार फक्त पार्सल सेवा 11 पर्यंत.

- खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.