Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा जास्त गेल्यास चौथ्या स्तराचे निर्बंध लागणार-जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

 महानगरपालिका क्षेत्रात वाढती कोरोना रूग्णसंख्या चिंताजनक 


पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा जास्त गेल्यास चौथ्या स्तराचे निर्बंध लागणार-जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी  

सांगली दि. 24  कोविड पॉझिटीव्हीटी दरानुसार राज्य शासनाने जिल्ह्यांना 1 ते 5 स्तरामध्ये विभागले आहे. सांगली जिल्ह्यात तिसऱ्या स्तरासाठी निर्धारीत केलेले प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. यानुसार जिल्ह्यात ब्रेक द चेन च्या अनेक निर्बंधामध्ये शिथीलता देण्यात आली आहे. तथापी, गत दोन – तीन दिवसांपासून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर जवळपास 10 टक्के व त्यापेक्षाही जास्त होत आहे. सदरची बाब गंभीर असून अशी स्थिती राहिल्यास महानगरपालिका क्षेत्रात ब्रेक द चेनच्या अंतर्गत पुन्हा चौथ्या स्तराचे निर्बंध लागू करावे लागतील. असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला आहे.

कोरोनाचे संकट पुर्णत: टळलेले नसून दुसरी लाट अजूनही सुरूच आहे. सांगली जिल्हा 14 जून पासून तिसऱ्या स्तरात आला असून त्यामुळे तिसऱ्या स्तरात अनेक बाबतीत निर्बंधांबाबत शिथीलता देवून व्यवहार सुरू करण्यात आलेले आहेत. जनजीवन हळूहळू सुरळीत होत असतानाच गत दोन - तीन दिवसांपासून  महानगरपालिका क्षेत्रात रूग्ण संख्या वाढती आहे. नागरिक मुक्तपणे आरोग्याचे नियम न पाळता व्यवहार करणार असतील आणि गर्दी करणार असतील तर कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढून मिळालेली निर्बंधामधील शिथीलता गमवावी लागेल. हे टाळावयाचे असल्यास योग्य सामाजिक अंतर पाळावे, गर्दी टाळावी, लक्षणे जाणवल्यास तातडीने चाचणी करून घ्यावी, संबंधित यंत्रणांनीही पॉझिटीव्हीटी दर आटोक्यात ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना काटेकोरपणे कराव्यात, असे  जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्देशित केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.