कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाही, ११ राज्यांत 'डेल्टा प्लस'चे रुग्ण
मुंबई - देशातील कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. केंद्र सरकारने शुक्रवारी याची खातरजमा केली आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) DG डॉ. बलराम भार्गव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
देशातील कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही, परंतु चांगली गोष्ट म्हणजे कोवीशील्ड आणि कोव्हॅक्सीन आतापर्यंतच्या सर्व प्रकारांविरूद्ध प्रभावी सिद्ध झाली आहे, असेही भार्गव यावेळी म्हणाले. डेल्टा प्लस व्हेरिएंट सध्या 12 देशांमध्ये आहे. आतापर्यंत देशातील 11 राज्यात 50 प्रकरणे आढळली आहेत.
सध्याच्या लसी डेल्टा प्लस व्हेरिएंटवर किती प्रभावी आहेत यावर संशोधन चालू आहे. डॉ. भार्गव यांनी माहिती दिली की आतापर्यंत अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा या बदलांच्या आधारे डेल्टा प्लससाठी या लसीची कार्यक्षमता ओळखली जात आहे. त्याचे निकाल पुढील 7 ते 10 दिवसात उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.